
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अख्खा महाराष्ट्र शोकाकूल झाला. 28 जानेवारी रोजी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला येत होते, मात्र बारामती एअरपोर्टजवळ आल्यानंतर त्याचं प्लेन अचानक क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. तसेच विमानातील आणखी चौघंही ठार झाले. त्यांच्या जाण्याने अख्खी बारामतीच नव्हे तर राज्य हळहळलं. मात्र त्यांच्या मृत्यूला काही दिवस उलटल्यानंतर त्यांच्या निधनाबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.
अजित पवार यांचे पुतणे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईव दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांचा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली. तसेच अजित पवार गाटातील काही नेत्यांनीही या मुद्याला दुजोरा दिला आहे. आता अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित दादांच्या अपघाताचा खासगी गुप्तेर संस्थेकडून पास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार आहेत.
राजधानीत काय घडलं ?
गेल्या आठवड्यात ते दिल्लीला गेले होते. राजधानीत असताना रोहित पवार यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली असेही समजते. या दोन्हीपैकी एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचं काम दिलं जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणांवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थांकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा घटनाक्रम त्यांनी संपूर्ण मांडला होता. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.
अजित दादांचा हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशयही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सरकारी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला. किंवा हा तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रोहित पवार हे दोनपैकी एका संस्थेकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात जेव्हा ते दिल्ली दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी काही खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची संपूर्ण माहिती त्या गुप्तहेर संस्थांना दिली. याचा तपास देखील या संस्थाकडून करून घेतला जाणार असल्याचे समजते.
रोहित पवार यांचं महत्वाचं ट्विट
याचदरम्यान रोहित पवार यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. ” स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !” , अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 16, 2026