Ajit Pawar Plane Crash : काही गोष्टी सांगायच्या आहेत… आदल्या रात्री पिंकी माळी काय सांगणार होती? वडिलांचा गौप्यस्फोट काय?

Shivkumar Mali : पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदल्या रात्री पिंकी काहीतरी सांगणार होती असं त्यांनी म्हटलं आहे. शिवकुमार माळी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

Ajit Pawar Plane Crash : काही गोष्टी सांगायच्या आहेत... आदल्या रात्री पिंकी माळी काय सांगणार होती? वडिलांचा गौप्यस्फोट काय?
Pinky Mali Father
Image Credit source: Google
| Updated on: Feb 11, 2026 | 7:34 PM

अजित पवार यांचे बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात अजित दादांसह विमानातील 5 लोकांचा मृत्यू झाला होता. यात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही समावेश होता. या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित करत हा घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. यानंतर आता पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदल्या रात्री पिंकी काहीतरी सांगणार होती असं त्यांनी म्हटलं आहे. शिवकुमार माळी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

पिंकी काहीतरी सांगणार होती…

शिवकुमार माळी म्हणाले की, रोहित पवार यांची कालची पत्रकार परिषद मी पाहिलेली आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. आम्ही रोहित पवारांनी केलेल्या सखोल चौकशीच्या मागणीच समर्थन करतो. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवीत. पुढे बोलताना त्यांनी, पिंकी आदल्या रात्री काही गोष्टी सांगायच्या आहेत असे म्हणाली होती पण त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही घटना घडली असं म्हटलं आहे. त्यामुळे पिंकी माळी नेमकं काय सांगणार होत्या याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सखोल चौकशी व्हावी – शिवकुमार माळी

पुढे बोलताना शिवकुमार माळी यांनी या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली. ते म्हणाले की, सीआयडीबरोबरच बाकीच्या तपासयंत्रनाकडून चौकशी व्हायला हवी. वीएसआर कंपनीकडून आम्हाला अद्याप नीट संपर्क केला जात नाही. आम्ही फोन केल्यावर ते बोलतात पण स्वतःहून संपर्क करत नाहीत. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण आमच्या घरातील कमावती मुलगी पिंकी होती, आम्हाला आता आधाराचीही गरज आहे हेही शासनाने लक्षात घ्यावं.

या तिघांवर रोहित पवारांना शंका

रोहित पवार यांनी म्हटले होते की ‘हा अपघात हा घात होता अशी सर्वांना शंका आहे. मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली. कशी घडली. कुणाचं विमान होतं. ही सर्व माहिती तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतोय असं नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. याबाबत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ऐनवेळी विमानाचे पायलट बदलण्यात आले होते असं म्हणत या अपघाताची सखोल चौकशी व्हावी असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.