AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट? ऐनवेळी विमानांची अदलाबदली? नेहमी ब्लॅक जेट, त्यावेळी… धक्कादायक गौप्यस्फोट काय?

Shivkumar Mali : अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर शंका उपस्थित केली होती. आता पिंकी माळीच्या वडिलांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे.

अजितदादा अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट? ऐनवेळी विमानांची अदलाबदली? नेहमी ब्लॅक जेट, त्यावेळी... धक्कादायक गौप्यस्फोट काय?
Ajit PawarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 11, 2026 | 7:11 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर शंका उपस्थित केली होती. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं होतं. यानंतर आता पिंकी माळी यांच्या वडिलांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवकुमार माळी यांचा गौप्यस्फोट

पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी म्हटले की, रोहित पवार यांचे प्रझेन्टश पाहीले, मी त्यांच्या मताशी सहमत होते, घातपात होऊ शकतो. माझी मुलगी दादांसोबत 5 वेळा विमान प्रवासात गेली होती. याआधी 4 वेळा ब्लॅक जेट होते, आत्ताच व्हाईट जेट का वापरले? असा प्रश्न शिवकुमार माळी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऐनवेळी विमानांचा अदलाबदली झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा घातपात तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंपनीने आम्हाला संपर्क केला नाही

पुढे बोलताना शिवकुमार माळी म्हणाले की, पिंकी बारामतीला जाऊन ती नांदेडला जाणार होती. तिथून शमशाबादला जाणार होती. अपघातानंतर माझा जावई बारामतीला गेला, मी त्याच्यानंतर तिथे गेलो, त्यामुळे आम्हाला बॉडी मिळाली, नाहीतर अनोळखी बॉडी म्हणून पडली होती. कंपनीने आम्हाला कोणताही संपर्क केला नाही. रोहित पवारांनी जे जे विषय मांडले आहे आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत.

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अजितदादा यांच्या विमानाची माहिती दिली. सोबतच त्या विमानात असलेले पायलट, विमानाच प्रवास, बारामतीचे विमानतळ, विमान प्रवासादरम्यानचे हवामान अशा अनेक अंगानी भाष्य केले. तसेच अजितदादांसोबत घातपात झाला होता, अशी शंका उपस्थित करताना त्यांनी काही दावे केले आहेत. ‘अजितदादांसोबत घातपात झाला का? याचा शोध घेतला पाहिजे. अजितदादा हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्या अपघाताच तपास झाला पाहिजे. 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर चार ते पाच तास मी काम करेन. माझ्या पक्षाचे काही नेते, अधिकारी भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर मी मुंबईला जाईल, असे अजितदादांना सांगितले होते. तसे नियोजन होते,’ असा दावा रोहित पवार यांनी केला.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.