अजित पवार यांच्याकडे गृहखातं द्यावं, शरद पवार गटाच्या मागणीने भुवया उंचावल्या; काय घडतंय महाराष्ट्रात?

बदलापूर बलात्कार प्रकरणामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मध्यंतरी दिल्लीला केंद्रात पाठवविणार अशी कुजबूज सुरु झाली होती. आता त्यांच्या प्रतिमेला एकामागोमागील प्रकरणांनी तडा गेलेला आहे.

अजित पवार यांच्याकडे गृहखातं द्यावं, शरद पवार गटाच्या मागणीने भुवया उंचावल्या; काय घडतंय महाराष्ट्रात?
ajitdada pawar
| Updated on: Aug 22, 2024 | 7:30 PM

पुणे ड्रग्ज रॅकेट पाठोपाठ घडलेले पोर्शे कार प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीने गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा खात्यावर वचक राहीला आहे की नाही अशी शंका येऊ लागली आहे. एकीकडे माझ्या हातात सत्ता द्या आणि 48 तासांत पोलिसांचे हात मोकळे करुन एका एकाला सुता सारखा सरळ करतो असे आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस हे पार्ट टाईम गृहमंत्री आहेत अशी झोंबरी टिका केली असताना आता गृहमंत्री पदाची  भाकरी परतावी असा सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केल्याने मागणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बदलापूर बलात्कार प्रकरणात पोलिसांमुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यंतरी दिल्लीला केंद्रात पाठवविणार अशी कुजबूज भाजपाच्या गोठातून सुरु झाली होती. त्यातच पुण्यासारख्या संवेदनशील शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती. त्यानंतर कल्याण येथे महायुती आणि भाजपाच्या नेत्यातील गॅंगवारात पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार आणि त्यानंतर शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होऊन फेसबुक लाईव्हवर झालेले हत्याकांड यामुळे एकंदरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

हे फडणवीस यांचं काम नाही

गृहमंत्रीपद सांभाळणे हे देवेंद्र फडणवीस यांचं काम नाही. आता उरलेले काही महिने गृहमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे द्यावे. ते उत्तमपणे सांभाळतील. ते कडक स्वभावाचे आहेत. त्यांना ते चांगल जमेल किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या ताब्यात गृहमंत्रालय घ्यावे अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.राष्ट्रवादी दोन्ही गटात फुट झाल्याने दोन्ही गटातील नेत्यांमधून विस्तव जात नसताना शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अजितदादांची तारीफ केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.