Sushil Karad : ये थांब… ये थांब…; वाल्मिक कराडच्या पोराच्या ऑडिओ क्लिपने खळबळ, महिलेला दिल्या घाणेरड्या शिव्या

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यानंतर आता एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. जी सुशील कराड आणि पीडित महिलेसंदर्भातील आहे.

Sushil Karad : ये थांब... ये थांब...; वाल्मिक कराडच्या पोराच्या ऑडिओ क्लिपने खळबळ, महिलेला दिल्या घाणेरड्या शिव्या
sushil Karad audio Clip
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 5:03 PM

सागर सुरवसे, सोलापूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सुशील कराड याने पीडित महिलेला फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे संभाषण समोर आली असून tv9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या महिलेला फोनवरुन शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं या क्लिपमध्ये संभाषण रेकॉर्डेड आहे. कालच सुशीलवर महिलेचा विनयभंग आणि घरामध्ये घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे. पण टीव्ही९ मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

दोघांतील संभाषण नेमकं काय?

सुशील कराड – मी सुशील बोलतोय बोला,काय म्हणणं आहे तुमचं?

Loading...

पीडित महिला – कशाबद्दल,कशाचं म्हणणं म्हटलं?

सुशील कराड – त्यांना काय म्हणत आहात तुम्ही,अण्णासोबत (वाल्मिक कराड) काय बोलणं झालं आहे तुमचं?
अण्णा म्हटले का तुम्हाला परळी सोडून जा, आमचा व्यवहार तसंच ठेऊन?

पीडित महिला – अण्णा म्हटले होते.

सुशील कराड – अण्णा, तुम्हाला तुमचं कानाचा ऑपेरेशन करून या म्हटले होते.

पीडित महिला – ऑपेरेशन करण्यासाठी आम्ही गावाकडे जाणार होतो.

सुशील कराड – ऑपेरेशन करून या, म्हटले होते.

पीडित महिला – ऑपेरेशन करून या म्हटले नाहीत, जा म्हटले.

सुशील कराड – ये थांब ये थांब…

पीडित महिला – नीट बोलायचं मला दादा

सुशील कराड – (शिव्या दिल्या आहेत)

पीडित महिला – थांब थांब, बघते तुला थांब.

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपनंतर एकच खळबळ उडाली आहे. पण या प्रकरणानंतर आता वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराडही गुन्हेगारी कृत्य करुन दहशत निर्माण करण्याचं काम करतो की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे. पण त्याचा मुलगा सुशील याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकणात पुढे काय होतंय याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us