AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल राज्यातील बड्या नेत्याचे भाष्य..

नुकताच अंबादास दानवे यांनी अमित शाह यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. अभिजीत दिपके यांच्या संजय शिरसाट यांच्या भेटीवर त्यांनी भाष्य केले. यासोबतच गोगावले यांच्या मंत्रिपदाबद्दल त्यांनी भाष्य केले.

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल राज्यातील बड्या नेत्याचे भाष्य..
Bharat Gogawale
| Updated on: Aug 02, 2026 | 5:51 PM
Share

नुकताच अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे विधान केले. अंबादास दानवे यांनी म्हटले की, गृहमंत्री अमित शाह हे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे जे वाटते त्या लोकांना सपोर्ट करतात हे लोकांना कळतं. देवेंद्र फडणीस सुद्धा अमित शाहांना फुकट मदत नाहीत, हेही कळतं भाषणात काही दोन शब्द बोलले असतील गोड. एकंदरीत जे राजकीय चित्र दिसत एकमेकांचे आडवा आणि एकमेकांची जिरवा अशा पद्धतीने चालेल स्पष्टपणे दिसते.  शिवसेनाप्रमुखांच्या विचारासाठी गेलो म्हणणाऱ्या लोकांना आता शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावायला भीती वाटते. आता त्यांचे नेते अमित शहा झाले आहेत. नरेंद्र मोदी सुद्धा नेते आहेत की नाही माहित नाही. परंतु अमित शाह त्यांचे नेते झाले आहेत.

सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, अशा चर्चेला काही अर्थ नसतो अशा चर्चा होत असतात, पण या चर्चेतून अमित शहा फार काही करतील असं मला वाटत नाही. सिस्टीम ठरलेली आहे, त्यांच्या पक्षाची त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी काम करते. त्यामुळे काही सापडणार नाही आणि काही भेटणार नाही.

भरत गोगावले यांच्याबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, खर तर ते पालकमंत्री होण्यासाठी इतके आतुर आहेत. त्यांची जास्त संख्या असणारी सीट सुद्धा पालकमंत्री पदासाठी तटकरेंना सोडली.  ते इलेक्शन होऊनही दोन अडीच महिने झाले. मात्र, गोगावल्यांची इच्छा काही पूर्ण होत नाही. म्हणून अशा गोष्टी त्यांना बोलाव्या लागतील. राजीनामा देणे मात्र कोणता मंत्री काय राजीनामा देत नाही.

शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना यांना अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून सुनावल्याच्या मुद्द्यात बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, हा पब्लिसिटीचा स्टंट आहे, अभिजीत दिपकेची चळवळ योग्य दिशेने चालू आहे, त्यात आपण राजकारणाची मिसळ करू नये असं मला वाटतं. अभिजीत किंवा जी तरुणाई आवाज उठवते ते राजकीय निराशातून उभे राहिलेले चळवळ आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाने त्यात इंटरफेअर करू नये सपोर्ट देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. संजय शिरसाट, बच्चू कडू अभिजीत दीपके यांना भेटले तर अभिजीत दिपके आंदोलनाला त्याचा सपोर्ट होता का? तरुणाईवर जो लॉटरीचा झाला त्याला त्यांचा विरोध आहे का? अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे ही त्यांची मागणी आहे का? धर्मेंद्र प्रधान यांनी नीटमध्ये घोटाळा केला या मागणीसाठी ते सुस्पष्ट आहेत का याचाही खुलासा केला पाहिजे. एकीकडे तुमचे मालक अमित शहांचे पाय दाबतात आणि तुम्ही अभिजीत दीपके यांच्या घरी जाता हे दुपट्टेपणा आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?