डिलिमिटेशन बिलावरून वाद थेट सुप्रिया सुळे यांनी पहिली पोस्ट, तो फोटो शेअर करत..

डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने घेतला. त्यांच्या या निर्णयाला राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. काँग्रेसकडून जोरदार टीका ही केली जात आहेत. राज्यातील राजकारणात घडामोडी घडताना दिसत आहेत.

डिलिमिटेशन बिलावरून वाद थेट सुप्रिया सुळे यांनी पहिली पोस्ट, तो फोटो शेअर करत..
Supriya Sule
| Updated on: Nov 28, 2026 | 11:54 AM

डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून पाठिंबा दिला जात आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचे खासदार जाणार नाहीत. सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याचे कालच पक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर पवारांच्या पक्षाचे खासदारही बैठकीत सहभागी होणार नाहीत. कालच जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले की, आम्ही डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा या बिलाला पाठिंबा असेल. पवारांच्या पक्षाच्या भूमिकेनंतर काँग्रेसने आपला संताप व्यक्त केला. हेच नाही तर सत्तेशिवाय पवार राहू शकत नसल्याचे स्पष्ट विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. पाठीत खंजीर खुपसण्याचा त्यांच्या पक्षाचा इतिहास असल्याचे मोठे विधान वडेट्टीवर यांनी केली.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर टीका केली. शरद पवार सध्या रूग्णालयात आहेत. गाैतम अदानी नुकताच पवारांच्या भेटीला पोहोचले होते. पवारांच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो काही निर्णय घेतील, ते आम्हाला मान्य असल्याचे खासदारांचे म्हणणे असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Loading...

जितेंद्र आव्हाड यांनी काल डिलिमिटेशन बिलाला आमचा पक्ष पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनीही पवारांच्या पक्षावर टीका केली. यादरम्यान सुप्रिया सुळे नक्की काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी पहिली पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, प्रिय दादा… तुझी उणीव संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक क्षणी जाणवते. तुझ्यासोबत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण कायम आमच्या सोबत आहेत. या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील. यावेळी त्यांनी एक फोटो शेअर केला. या फोटोत अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई दिसत आहेत. सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असताना त्यांनी अजित पवार यांच्या आठवणीत पोस्ट शेअर केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us