AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पवार गटाच्या आमदार, खासदारांत मोठी खदखद, थेट दोन गट पडले? पडद्यामागे एकनाथ शिंदेंशी…

सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज आहेत.

मोठी बातमी! पवार गटाच्या आमदार, खासदारांत मोठी खदखद, थेट दोन गट पडले? पडद्यामागे एकनाथ शिंदेंशी...
sharad pawar ncp Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 28, 2026 | 11:35 AM
Share

Delimitation Bill : सध्या देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे. कायम विरोधात असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या विधेयकाच्या बाबतीत एनडीएला पाठिंबा देणार आहे. पवार गट इंडिया आघाडीचा भाग आहे. या विधेयकावर भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीलाही पवार गट उपस्थित राहणार आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या तसेच देशाच्या राजधानीत मोटी खळबळ उडाली आहे. पवार गटाचे खासदार या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार गटामधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधेयकावरून पवार गटातच दोन गट पडल्याचे सूत्रांनी सांगितलंय.

नेमकी काय माहिती समोर आली?

सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पक्षाची असलेल्या संस्पेन्स भूमिकेनं काही नेत्यांच्या मनात खदखद आहे. आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे. त्यानंतर आता या विधेयकावरूनही अद्याप सस्पेन्स आहे. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने नेत्यामध्ये नाराजी आहे.

याबात काही आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेकडे नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदारांनी एकनाथ शिंदेकडे आपली ही खदखद व्यक्त केली आहे. ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुले आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांचे खासदार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आता पवार गटाच्या भूमिकेबाबतचा स्पेन्स वाढला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून पवार गटावर थेट टीका केली जातेय. पवार यांना सत्तेत जायचे वेध लागले आहेत, असे खडे बोल काँग्रेसने सुनावले आहेत. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
Saamana On Delimitation Bill : विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून...
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय चर्चांना नवं वळण
.....मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण
Congress On Sharad Pawar : शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने जागा सोडली, मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण