मोदी सरकारची ताकद वाढली; डिलिमिटेशनला आणखी एका पक्षाचा पाठिंबा, 22 खासदार…
मोदी सरकारची ताकद आणखी वाढणार आहे. डिलिमिटेशनवरून आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.

देशात डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 22 खासदार असलेल्या डीएमके पक्षाने डिलिमिटेशन विधयेकाला पाठिंबा दर्शवला आहे. एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाची शनिवारी एक बैठक केली. या बैठकीत डिलिमिटिशेनला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे ठरलं आहे. डीएमके यांच्या पक्षाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेतील दोन-तृतियांश खासदारांच्या मतांची गरज आहे. या अधिवेशनाआधीच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या विधेयकावरील भूमिकेला आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. 22 खासदार असलेल्या डीएमके पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
