AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिटं चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी एअरपोर्टवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटं चर्चा झाली आहे. यावेळी अमित शाह यांनी शिंदेंना मोठं आश्वासन दिलं आहे.

एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिटं चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
अमित शाह, एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 3:54 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एका कौटुंबीक कार्यक्रमानिमित्त आज मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखी देखील बांधली. दरम्यान त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एअरपोर्टवर दहा मिनिटं एकांतात चर्चा झाली आहे.

एअरपोर्टवर एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले, या भेटीवेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेमधील मंत्री नाराज आहेत, शिवसेना मंत्र्यांमध्ये असलेल्या असंतोषावर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान यावेळी  चिंता करू नका, असं आश्वासन  एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी  

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत आदेश दिला होता. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दरम्यान 15 ऑगस्टनंतर ज्या रिक्षाचालकांकडे मराठी भाषेचं प्रमाणपत्र नाही किंवा ज्यांना मराठी भाषा बोलता येत नाही, अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात झाली होती. यावरून परप्रांतीय रिक्षा चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

रीक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यावरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच सर्व विषयावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान यावेळी चिंता करू नका, असं आश्वासन अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट