मोठी बातमी! अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं, अपडेट काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. या दोघांमध्ये काय खलबतं झाली याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

Amit Shah and Eknath Shinde Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट झाली. हे दोन्ही नेते एकाच वाहनातून आले. या दोघांमध्ये अर्ध्या तासाहून अधिक काळ खलबतं झाली. गेल्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेट होत आहे. यापूर्वी रक्षा बंधनानंतर दोन्ही नेत्यांनी विमानतळावर हितगुज साधले होते. सध्या सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची यावरून सुनावणी सुरू आहे. त्यात शिंदेंच्या बाजूने युक्तीवाद सुरू आहे.
फडणवीस आणि शिंदेही उपस्थित
फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला अमित शाह भेट देणार आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी अमित शाह हे संवाद साधणार आहेत. सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ दर्जा देण्याची मागणी केंद्राकडे प्रलंबित आहे. गेल्या चार वर्षांपासून ही मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. अमित शाहांच्या भेटीमुळे प्रलंबित मागणीला बळ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत.
अमित शाहांच्या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे. पा. वा. काणे लिखित पाच खंडांतील ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ संस्थेत जतन करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या उगमाशी धर्मशास्त्राचा संबंध असल्याने या ग्रंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अर्धा तास एकत्र गाडीत प्रवास
केंद्रीय गृहमंत्र्यांची शिंदे यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी अर्धा तास एकत्र गाडीत प्रवास केला. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. चर्चेचे पेव फुटले आहेत. अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दोघांमध्ये राज्यातील घडामोडी आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. शाह हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दाखल झाले आहे. ते लालबागचा राजा आणि चिंचपोकळीची चिंतामणीच्या दर्शनाला जाणार आहेत. दरम्यान दोन्ही नेत्यांमधील या बैठकीमुळे पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले आहे.