Amit Thackeray : तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर.. अमित ठाकरेंनी सुनावलंच
अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले तरी, सरकारने मागण्या आधीच मान्य केल्या असत्या तर विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती, असे त्यांचे मत आहे. मुलींचे कपडे फाडणे, मुलांना खिळे मारणे याला सरकार जबाबदार आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा इशारा त्यांनी दिला.

सराकरमधील मंत्र्यांशी चर्चा केल्यावर आणि तीन मागण्या मान्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल त्यांचं उपोषण संपवलं. यावर विविध प्रतिक्रिया येत असून मनसे नेते अमित ठाकरे यांनीही भाष्य केलं. सर्वप्रथम तर संपूर्ण देशाचं अभिनंदन, की 3 मागण्या केल्यात. पण हे जर आधी केलं असतं तर या सगळ्याची गरजच पडल नसती, असं अमित ठाकरेंनी सुनावलं. आज मुलींचे कपडे फाडले गेले, मुलांना खिळे ठोकून त्यांना मारहाण करण्यात आली,याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल अमित ठाकरे यांनी विचारला. जर विद्यार्थी समाधानी, सुरक्षित नसतील तर आम्ही उतरणार, त्यांच्यावर हात उचलू देणार नाही, असंही त्यांनी सुनावलं. ही त्यांच्या हक्काची लढाई आहे, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. त्यांना जेव्हा समाधाना वाटेल ही लढाई संपेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी भूमिका मांडली.
शिक्षणमंत्री प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे, जोपर्यंत विद्यार्थी आमच्यासमोर रस्त्यावर उतरत आहेत. हे कोणत्याही एका पक्षाचं आंदोलन नाही, ते एवढ्या लेव्हलवर गेलंच नसतं. लोकं स्वयंस्फुर्तीने खाली रस्त्यावर उतरलेत आणि त्यामुळे आता सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेलं आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
चंद्रकांत पाटीलांवर डागली तोफ
एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते, त्याला केवळ समज दिली जाते. प्रत्येक गुन्ह्यासाठी थेट फाशीची शिक्षा देता येत नाही, त्यामागील हेतू आणि तीव्रतेनुसारच कारवाई ठरते. पेपर फुटण्यास कारणीभूत असलेले सर्व दोषी सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तरी आपण एकाच ढोषा लावून धरायचा. याचा अर्थ काहीतरी हेतू वेगळा आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विदानाचाही अमित ठाकरे यांनी चांगलचा समाचार घेतला. तिथे 20 मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. तुम्ही त्याची तुलना आंबे चोरी करण्याशी करताय . म्हणजे आता ते काय बोलत आहेत, हे पण त्यांना कळत नाहीये. हे कुठेतरी भरकटले आहेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडीओ पाहिले भाजपच्या, आधी ते किंचाळायचे, पण आता ते नम्र झालेत. देश पेटलायं हे आता त्यांनाही चांगलंच कळलं आहे, असं अमित ठाकरेंनी सुनावलं.
विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय, असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावरून अमित ठाकरेंना सवाल विचारण्यात आला. त्यावर दिलेलं उत्तर सगळे ऐकतच राहिले. ‘ मुख्यमंत्री आहात ना तुम्ही, मग विद्यार्थ्यांना बोलावून घ्या, चर्चा करा, त्यांना काय पाहिजे विचारा. नीटमुळे नागपूर-नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय, पहिले त्यांच्या घरी जा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला (रस्त्यावर)उतरायची गरज पडली नसती ‘ अशा शब्दांत अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारवर तोफ डागली.