Ravi Rana : अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप

| Updated on: Sep 10, 2022 | 7:02 PM

बॉर्डरवर जवान शहीद होतात. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं. पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नाही, असंही रवी राणा ठामपणे म्हणाले.

Ravi Rana : अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप
रवी राणा यांचा पोलीस आयुक्तांवर नवा आरोप
Follow us on

अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. असा आरोप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पोलीस आयुक्त (Commissioner of Police) आरती सिंह यांच्यावर केलाय.अमरावती पोलिसांकडे (Amravati Police) पीडित कुटुंब खूप वेळा गेले. मात्र पोलिसांनी अॅक्शन घेतली नाही, असा निशाणा रवी राणा यांनी पोलिसांवर साधला.आरती सिंह यांनी जो आरोपी पकडला होता त्या आरोपीचा खुलासा का केला नाही? जेव्हा ती मुलगी गायब होती तेव्हा हे लोकं पुढे का आले नाही?, असा सवालही त्यांनी विचारला.

गुन्हे दाखल करण्याची सुपारी

रवी राणा म्हणाले, गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होते. मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनात मला दिवाळीच्या तीन दिवस आधी अटक केली. शाईफेक प्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल केले. नवनीत राणांवर गुन्हे दाखल केले. जेव्हा जेव्हा मी जनहिताचे प्रश्न मांडले तेव्हा आयुक्त आरती सिंह यांनी नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करण्याची पूर्ण सुपारी आरती सिंह यांनी घेतली, असा घणाघातही त्यांनी केला.

पोलिसांचा नेहमी सन्मान केला

पोलिसांचा नेहमी आदर आणि सन्मान केला. शहीद पोलिसांच्या कुटुंबासाठी मी केंद्र सरकारकडून सुविधा मिळवून दिल्या. बॉर्डरवर जवान शहीद होतात. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं. पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नाही, असंही रवी राणा ठामपणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अमरावतीत वसुली पथकं सुरू केलं

आरती सिंह यांनी वसुली पथक अमरावतीत सुरु केलं. आरती सिंह यांनी काही नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले. अमरावतीत जेव्हापासून आरती सिंह आल्या तेव्हापासून रोज तीन ते चार हत्या होतात. कोल्हे प्रकरण जेव्हा झालं, तेव्हा कोल्हे यांची केस आरती सिंह यांनी केस दाबण्याचा प्रयत्न केला. एनआयएच्या टीमने त्या प्रकरणाची चौकशी केली, याची आठवण रवी राणा यांनी करून दिली.