खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे

पण, आज हेच दाम्पत्य कॉफी हाऊसमध्ये भेटले. त्या दोघांनी एकमेकांना व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. एकत्र कॉफी घेत व्हॅलेटाईन डे साजरा केला.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे
| Edited By: | Updated on: Feb 14, 2023 | 3:47 PM

अमरावती : राणा दाम्पत्य म्हटंल की, सडेतोड उत्तरं देणारे दाम्पत्य अशी ओळख आहे. पण, या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यामुळंच की काय आज त्यांनी त्यांच्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी व्हॅलेंटाईन जे साजरा केला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना कॉफी सेंटरमध्ये बोलावलं. त्याठिकाणी दोघांनीही एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. त्यानंतर दोघांनीही कॉफी घेतली. यावेळी राणा दाम्पत्यांनी तरुण-तरुणींना सल्ला दिला. नवनीत राणा यांची नाराजी मी कॉफीने दूर केली, असं रवी राणा म्हणाले.

बाबा रामदेव यांच्या शिबिरात झाली पहिली भेट

रवी राणा आणि नवनीत यांची पहिली भेट तशी मुंबईत २००९ मध्ये झाली. याच वर्षी रवी राणा पहिल्यांदा बडनेऱ्यातून आमदार झाले होते. त्यावेळी नवनीत या अभिनेत्री आणि मॉडल होत्या. बाबा रामदेव यांच्या शिबिरात रवी आणि नवनीत यांची भेट झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर नवनीत राणा या राजकारणात आल्या. आता त्या अमरावतीच्या खासदार आहेत. त्यापूर्वी त्यांचा तसा राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण, आता त्या समर्थपणे राजकारणाची धुरा सांभाळत आहेत.

सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न

विशेष म्हणजे या दोघांनी अमरावती येथील सामूहिक विवाह सोहळ्यात आपले लग्न केले. लग्नाला होणारी खर्चाची रक्कम त्यांनी गरिबांना दान केली. हे दाम्पत्य दिवाळीत गरिबांना धान्याचे मोफत वाटपही करतात.

एकमेकांना दिल्या शुभेच्छा

आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं या दोघांनी एकत्र येण्याचे ठरविले. तसे तर दोघेही आपआपल्या कामात व्यस्त असतात. आमदार आणि खासदार दाम्पत्य लोकांमध्ये मिसळतात. त्यांचे प्रश्न समजून घेतात. त्यासाठी लढाही देतात.

पण, आज हेच दाम्पत्य कॉफी हाऊसमध्ये भेटले. त्या दोघांनी एकमेकांना व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. एकत्र कॉफी घेत व्हॅलेटाईन डे साजरा केला. एकमेकांना गुलाबाचे फूल भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या.