5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याचा अर्ज, मुंबईत..

मराठा समाजाचे आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. जालन्यातून मनोज जरांगे पाटील थेट मुंबईला पोहोचणार आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. पाच हजार लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला.

5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याचा अर्ज, मुंबईत..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 13, 2026 | 10:00 AM

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे स्पष्ट केले. कधी कुठे मुक्काम असणार आणि मार्ग नक्की काय असणार हे जरांगेंनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंनी भेट घेण्यात आली. मात्र, जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले. त्यातच सरकारकडून गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत न येण्याची विनंती जरांगेंना करण्यात आली. मात्र, जरांगे यांनी आता मुंबईत येणार असल्याची मोठी घोषणा केली. आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणाल बसतील. यासोबतच त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल होईल. विराट मोर्चा काढण्याची घोषणा जरांगे यांनी केली.

मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू केले जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याने आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज दाखल केला. 19 तारखेला मुंबईत येणार आणि आझाद मैदानात आंदोलन करणार असे अर्जात नमूद करण्यात आले.

आझाद मैदान पोलीस आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष आहे. जरांगे यांचा रूट मैप आणि मुंबईत पोहोचण्याची तारीख कळवत हा अर्ज दिला आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी कधी कुठे मुक्काम असणार आणि मुंबईत कधी दाखल होणार हे स्पष्ट केले. यासोबतच लोकांच्या खाण्याची सर्व व्यवस्था करा, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. या अर्जामध्ये थेट 5 हजार जणांना आंदोलनासाठी परवानगी द्या, असेही म्हटले.

म्हणजे जरांगे यांच्यासोबत पाच हजार लोकांसाठीही परवानगी मागण्यात आली. अटी शर्थींचे पालन करू असेही, अर्जात म्हणण्यात आले. ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारल्याप्रमाणेच जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजानेही आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानही मागितली होती. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आता मराठा समाजाला परवानगी मिळते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us