वैष्णवी खरंच तरुणाशी चॅटिंग करायची? खुद्द वडिलांनी हगवणेला उघडं पाडलं!

वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हगवणे कुटंबाच्या वकिलाने केलेल्या दाव्यांची चिरफाड केली.

वैष्णवी खरंच तरुणाशी चॅटिंग करायची? खुद्द वडिलांनी हगवणेला उघडं पाडलं!
vaishnavi hagawane and anil kaspate
| Updated on: May 29, 2025 | 4:27 PM

Anil Kaspate : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणातील सर्व पाच आरोपी कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाने वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. ती एका मुलाशी चॅटिंग करत होती. त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यामुळेच ती त्याला बोलत होती, असा दावा हवगणे कुटंबाच्या वकिलाने केला होता. त्यानंतर आता याच दाव्यांवर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या आरोपांबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

मी माझ्या मुलीचा मोबाईल…

अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन वकिलाने केलेल्या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याचे काम केले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसेच मी माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही. उलट आरोपीलाच दीड लाखांचा मोबाईल घेऊन दिला, असा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केलाय.

वैष्णवीच्या वडिलांनी नेमकं काय सांगितलं?

वैष्णवी अन्य मुलाशी चॅटिंग करत होती. आम्ही याबाबत वैष्णवीच्या आई-वडिलांना कल्पना दिली होती. त्या मुलाने बोलण्यास नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली असावी, असा दावा हगवणे कुटंबाच्या वकिलाने केला होता. यावर बोललताना मला चॅटिंगसंदर्भात हगवणे कुटंबाने पुसटशीही कल्पना दिलेली नाही. त्या विषयावर कोणतंही भाष्य झालेलं नाही. चॅटिंगचं उदाहरण देऊन त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर सरळ-सरळ संशय घेतला आहे, असं अनिल कस्पटे यांनी म्हटलंय.

मीच आरोपीला दीड लाखांचा फोन दिला

तसेच, मी माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला, असा त्यांचा आरोप आहे. मी माझ्या मुलीला मोबाईला अगोदरच दिलेला होता. सोबतच मी आरोपीलाही एक लाख 52 हजारांचा मोबाईल घेऊन दिलेला आहे. त्यांच्या मागणीनुसार हा मोबाईल मी घेऊन दिला आहे. त्यावेळी माझी मुलगी माझ्या घरी होती. ते वाकडच्या क्रोमा सेंटरमध्ये ते आले. माझ्या मुलीला त्यांनी तेथे बोलवून घेतलं. मला तुझ्या पप्पांकडून मोबाईल घेऊन दे, असं आरोपीने माझ्या मुलीला सांगितलं होतं. त्यानंतर माझ्या मुलीनं मला कॉल केला होता. त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांच्या मागमीनुसार मी त्यांना मोबाईल दिलेला आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय.

दरम्यान, वैष्णवीच्या चारित्र्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर हगवणे कुटुंबाच्या वकिलाने आम्ही वैष्णवीचे चारित्र्यहनन केलेले. ती कोणत्या मुलाशी बोलायची, त्या मुलाचं नाव मी घेऊ इच्छित नाही, असं त्या वकिलाने सांगितलं.