गर्भवती महिलेचेही लैंगिक शोषण, अशोक खरातला पोलिस दाखवणार खाक्या, भोंदुबाबाचा SIT कडून घेतला ताबा

Ashok Kharat : गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याची अडचण आणखी वाढली आहे.

गर्भवती महिलेचेही लैंगिक शोषण, अशोक खरातला पोलिस दाखवणार खाक्या, भोंदुबाबाचा SIT कडून घेतला ताबा
Ashok Kharat and Police
Image Credit source: Google
| Updated on: Mar 22, 2026 | 5:46 PM

संपूर्ण राज्यात सध्या नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात खरातला अटक करण्यात आली होती. यानंतर इतरही काही महिलांनी खरात विरोधात तक्रार दाखल करण्याचे समोर आले आहे. आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडिता आणि तिच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अशोक खरातचा SIT च्या पथकाकडून ताबा घेतला असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.

गरोदर महिलेचे लैंगिक शोषण

समोर आलेल्या माहितीनुसार एका गरोदर महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. नराधम खरातने महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसवून लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेत अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. त्यामुळे अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरात आता पोलिसांच्या ताब्यात

यानंतर आता नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरात याचा ताबा घेतला आहे. SIT चौकशी सुरू असताना आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने नाशिक पोलिसांनी SIT कडे पत्रव्यवहार करत ताबा घेतला आहे. यानंतर पोलिसांनी खरातला नाशिक क्राईम ब्रँच कार्यालयात आणले आहे. आता क्राईम ब्रँचकडून भोंदू बाबाची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

मोठे खुलासे होणार

दरम्यान, गर्भवती महिलेवरही अत्याचार केल्याच्या या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मानसिक छळ, धमकावणे, जादूटोणा आणि अघोरी कृत्यांपर्यंत पोहोचले आहे. SIT आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात तातडीने कारवाई करत असून, लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us