AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल सात तास चौकशी, आज अचानक अज्ञातस्थळी नेलं! भोंदूबाबा प्रकरणात मोठी अपडेट; यांचीही होणार चौकशी

नाशिकमधील भोंदू 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. अशोक खरातचे काळे धंदे उघडत होत आहेत. ही सर्व प्रकरणे पाहून अनेकांनी अशोक खरातला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, SITने चौकशीचे ठिकाण अचानक बदलले आहे.

काल सात तास चौकशी, आज अचानक अज्ञातस्थळी नेलं! भोंदूबाबा प्रकरणात मोठी अपडेट; यांचीही होणार चौकशी
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 22, 2026 | 2:44 PM
Share

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी खेळी खेळली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून, आज खरातची चौकशी अज्ञातस्थळी करण्यात येत आहे. तीन दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब येथे सुरू असलेली चौकशी आता वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे.

काल कोणत्या विषयांवर चौकशी झाली?

SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः या चौकशीला उपस्थित राहत आहेत. काल (शनिवारी) अशोक खरातची तब्बल सात तास चौकशी झाली होती. या चौकशीत खरातच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी, देणगीदार, भागीदार आणि महिलांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सखोल विचारणा करण्यात आली.

आज अज्ञात स्थळी चौकशी

आजच्या चौकशीत मात्र खरातला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले असून, तेथे त्याच्या फार्महाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी यांचीही चौकशी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फार्महाऊसवर काम करणारे कर्मचारी आणि मंदिरात पूजा-अर्चना करणारे पुजारी हे खरातच्या दैनंदिन कारभाराचे महत्त्वाचे साक्षीदार मानले जात आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे खरातच्या ‘ज्योतिष’ आणि ‘समस्या निवारण’च्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या व्यवहारांचा आणि महिलांशी झालेल्या संवादांचे आणखी स्पष्ट चित्र समोर येऊ शकते.

खरात सध्या SIT च्या रडारवर असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी खरातच्या घर आणि कार्यालयातून ८ लाख रोख, पिस्तूल, आक्षेपार्ह व्हिडिओ, मालमत्तेची कागदपत्रे जप्त झाली आहेत. तसेच आयकर विभागानेही त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्ता आणि व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आता फार्महाऊस, मंदिर आणि त्येथील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित झाले आहे. SIT च्या या अचानक चौकशी स्थान बदलण्यामागे गोपनीयता राखणे आणि बाहेरून दबाव टाळणे हा उद्देश असल्याचे मानले जात आहे. खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?