ATS ची धरपकड सुरुच, मुंब्र्यातून आणखी एकाला अटक

ठाणे : काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक या 24 वर्षीय तरुणाला अटक केली. हा तरुण मुंब्रा येथील ऍम्ब्रॉड टॉवरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. यापूर्वी अटक झालेल्या नऊ संशयित ओरोपींसोबत आणि …

ATS ची धरपकड सुरुच, मुंब्र्यातून आणखी एकाला अटक

ठाणे : काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक या 24 वर्षीय तरुणाला अटक केली. हा तरुण मुंब्रा येथील ऍम्ब्रॉड टॉवरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. यापूर्वी अटक झालेल्या नऊ संशयित ओरोपींसोबत आणि देशद्रोही संघटनेशी तलाहचा संबध असल्याचा संशय आहे.

तलाह नावाच्या तरुणाला अटक केली असून, काल औरंगाबाद येथील न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाने त्याला हजर केले. न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तलाह हा बॅचलर ऑफ मनेजमेंटचा विद्यार्थी आहे.

आयएसआयएस या प्रतिबंधित  दहशतवादी  संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरुन तलाहला अटक करण्यात आली. या तरुणाकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क असे साहित्य  जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रविवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी पकडलेल्या आरोपींचा तो प्रमुख साथीदार असल्याचा संशय आहे, असही पोलिसांनी सांगितले.

एटीएस पथकाकडून प्रजासत्ताक दिनाच्या आधी आणि प्रजासत्ताक दिनी केलेल्या दोन मोठ्या कारवाईमुळे मोठा धोका टळलेला आहे. नऊ जणांसोबत चौकशी सुरु असून आता दहशतवाद विरोधी पथक शोध घेत आहे. या घटनेनंतर तलाहच्या घरचे सदस्य, आई आणि वडील घरात नसून घराला लॉक आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *