इतिहासात पहिल्यांदाच; महिला एकवटल्या, हार्ट ऑफ द सिटी गुलमंडीवर गुलालाची उधळण, संभाजीनगरात अभूतपूर्व उत्साह, पाहा Photo

| Updated on: Mar 07, 2023 | 12:17 PM

होळीनिमित्त पुरुषसत्ताक पद्धतीतील कुप्रथांचं पोस्टरच्या माध्यमातून येथे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. त्यानंतर मनसोक्त रंगांची उधळण करत आनंद लुटला. शहरातील महिलांनी एकजुटीने होळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच; महिला एकवटल्या, हार्ट ऑफ द सिटी गुलमंडीवर गुलालाची उधळण, संभाजीनगरात अभूतपूर्व उत्साह, पाहा Photo
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरात (Sambhajinagar) यंदा प्रथमच अभूतपूर्व होळी खेळण्यात आली. हार्ट ऑफ द सिटी समजल्या जाणाऱ्या गुलमंडी येथे शहरातील असंख्य महिलांनी एकत्र येत होळी आणि धुळवडीचा आनंद लुटला. यंदा महिला दिन आणि धुळवडीचा उत्सव एकत्र आल्याने प्रथमच सामाजिक संस्थांनी गुलमंडी परिसरात विशेष होलिकोत्सवाचं आयोजन केलं. नुकत्याच झालेल्या जी 20 परिषदेमुळे शहराचं रुपच पालटलंय. त्यातच शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हेच औचित्य साधून शहराचं हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर महिलांनी दिमाखदार पद्धतीने होळी साजरी केली. होळीनिमित्त पुरुषसत्ताक पद्धतीतील कुप्रथांचं पोस्टरच्या माध्यमातून येथे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. त्यानंतर मनसोक्त रंगांची उधळण करत आनंद लुटला. शहरातील महिलांनी एकजुटीने होळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

होळीच्या दिवशी रस्त्या-रस्त्यातील चौकात पुरुषांच्या टोळ्या दिसतात. शिव्या देणे, बोंबा मारणे, आई-बहिणींच्या नावाने शिव्या देणे असे प्रकार सर्रास घडतात. यातील कुप्रथांना फाटा देत संभाजीनगरात महिलांनी पुरुषसत्ताक पद्धतीविरोधात होळी साजरी केली. होळी रंगोत्सवाच्या सुरुवातीला पुरुषी मनोवृत्तीची, पुरुषाकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाचं पोस्टरद्वारे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. त्यानंतर मनसोक्त रंगोत्सवाचा आनंद घेतला. शहरातील सामान्य महिला, गृहिणी, विद्यार्थिनी डॉक्टर, नर्स, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आदी सगळ्याच क्षेत्रांतील सर्व जाती-धर्माच्या महिला-मुली सहभाग घेतला. रंगात धुंद होत नृत्यही केले.

अनाथ मुलींची मिरवणूक

पुरुष सत्ताक प्रथांचे दहन केल्यानंतर शहरातील महिलांनी एकत्र येत मनसोक्त डान्सचा आनंद लुटला. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी ही अनोखी होळी रंगली. कुणाचीही भीती न बाळगता घरा-घरातून बाहेर पडून महिलांनी येथे गर्दी केली. ढोलताशा आणि पंजाबी बँडच्या तालावर थिरकल्या. विशेष म्हणजे बच्चे कंपनीसाठी येथे स्विमिंगपूलचं आयोजन करण्यात आलं. तसेच अनाथ मुलींची एका मोठ्या रथात बसवून मिरवणूक काढण्यात आली.


राज्यात पहिलाच उपक्रम

होळी म्हटलं की खरं तर प्रेमाचा, रंगाचा उत्सव. मात्र शहरा-शहरात या दिवशी पुरुषांच्या टोळ्या रस्त्यावर फिरत असल्याने महिला फार बाहेर पडत नाही. ही प्रथा संभाजीनगरने पहिल्यांदा मोडीत काढलीय. राज्यात अशा प्रकारची महिलांची विशेष होळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या महिला एकजुटीचं सर्वत्र कौतुक होतंय.