AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची दिग्गज क्रिकेटपटूने लाज काढली, काय चुकलं ते शिव्या देऊन सांगितलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरूद्धचा सामना गमावल्यानंतर कर्णधार सलमान आगा रडारवर आला आहे. पाकिस्तानात त्याच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने तर भर कार्यक्रमात शिव्या घातल्या. तसेच कुठे काय चुकलं ते सांगून टाकलं.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची दिग्गज क्रिकेटपटूने लाज काढली, काय चुकलं ते शिव्या देऊन सांगितलं
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाची दिग्गज क्रिकेटपटूने लाज काढली, काय चुकलं ते शिव्या देऊन सांगितलं Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 5:48 PM
Share

भारताविरुद्ध पराभव झाला तर पाकिस्तानी खेळाडूंची काही खैर नाही, हे जगजाहीर आहे. पाकिस्तानात टीव्ही फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना खेळताना आधीच दडपण असतं. त्यात आणखी भर पडली घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची.. खरं तर नाणेफेकीपासून सर्वकाही पाकिस्तानच्या पारड्यात होतं. पण सलमान आगाच्या निर्णयाचा फटका बसल्याचं. माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी सांगितलं. इतकंच काय तर प्रशिक्षक माइक हेसनची लाज काढली. त्याला काही कळतं की नाही अशा शब्दात टीकास्त्र सोडलं. तसेच बाबर आझमचा उल्लेख करताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. फलंदाजी करण्याची काय पद्धत आहे की नाही अशा शब्दात झोडून काढलं. एकंदरीत बासित अलीने पाकिस्तानी संघाला कशा पद्धतीने शब्दांचे बाण मारले ते जाणून घ्या.

पाकिस्तानी न्यूज चॅनेलवरील एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर बासित अलीने आपल्या मनातील सगळा राग काढला. बासित अलीने सांगितलं की, ‘मी काही शब्द बोललो तर मला माफ करा. त्या अज्ञानी लोकांना हे माहित नाही की जिथे जिथे हे सामने खेळले गेले आहेत तिथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्यासमोर झिम्बाब्वेचा सामना होता आणि आता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडली. ते म्हणतात की आमची गोलंदाजी खूप मजबूत आहे, म्हणून चांगल्या गोष्टी नंतर करा, मूर्खांनो, तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायला कोणी सांगितले?’

बासित अली पुढे म्हणाले की, ‘अभिषेक शर्मासारखा खेळाडू पहिल्याच षटकात बाद होतो, तोही सलमान आगाच्या गोलंदाजीवर…आता कर्णधाराचा बचावात्मक पवित्रा पहा. इतका भित्रा की त्याने पहिल्याच षटकात त्याला बाद केले. तसेच दोन षटकात 10 धावा दिल्या आणि तिसरा षटक टाकलं नाही. त्याने उस्मान तारिकला नंतर गोलंदाजी करायला लावून संधी वाया घालवल्या. ते बालिश क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला आधीच माहित होते की हरतील. आम्हाला आशा होती की पाऊस पडेल आणि गुण विभागले जातील. हे अज्ञानी लोक ज्यांना प्रथम गोलंदाजी करायची की प्रथम फलंदाजी करायची हे माहित नाही ते आता पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आहेत.’

बासित अली यांनी बाबर आझमवरही टीकेची झोड उठवली, ‘दिग्गज फलंदाज बाबर आझम चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि अक्षर पटेलला क्रॉस शॉट मारण्याच्या प्रयत्नात विकेट टाकतो. त्याला फलंदाजी कशी करावी हे शिकणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादवची फलंदाजी आणि त्याने मारलेले षटकार पाहा. इशान बाद झाल्यानंतर त्याने भागीदारी केली.’

Follow Us
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच