Video : कन्नडमध्ये बिबट्याचा धूमाकूळ, शिकारीसाठी लोकवस्तीत वावर, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. | Aurangabad leopard Entry Viral Video

Video : कन्नडमध्ये बिबट्याचा धूमाकूळ, शिकारीसाठी लोकवस्तीत वावर, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 11, 2021 | 10:48 AM

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गावातील काही तरुणांनी बिबट्याचा धुमाकूळ आपल्या कॅमेरात कैद केलाय. हाच व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल होतोय. (Aurangabad Kannad leopard Entry Viral Video)

कन्नड तालुक्यातील औराळा परिसरात शिकारीसाठी बिबट्याचा धाडशी वावर पाहायला मिळतोय. गावातील तरुणांनी फोर व्हीलर मधून केला बिबट्याचा पाठलाग केला. याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.

डुकरांच्या शोधत बिबट्याचा शेतवस्तीवर वावर वाढल्याचं पाहायला मिळतंय. शेतवस्तीबरोबरच मानववस्तीवरही बिबट्याचा वावर वाढल्याने औराळा परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

संगमेश्वरमध्येही बिबट्याचा थरार

त्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या वेळेला बिबट्याने रोड क्रॉस करुन पेट्रोल पंपावर प्रवेश केला. तसंच पेट्रोलवरच त्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला. यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्याची चांगलीच पाचावर धारण बसली. सविस्तर घटना अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंप ओस पडला होता. पंपावर कसलीही गर्दी नव्हती. त्याचवेळी बिबट्याने मुंबई गोवा हायवे ओलांडून पंपावर प्रवेश केला. आजूबाजूला थोडसं निरीक्षण करुन झाल्यावर बिबट्याला कुत्रं निदर्शनास पडलं. मग झालं तर बिबट्याने कुत्र्यावर झडप मारली.

बिबट्याने जशी कुत्र्यावर झडप मारली तसा कुत्र्याने मोठ्याने आवाज केला. या आजावाने पेट्रोल पंपावर उपस्थित कर्चचारी झोपेतून जागा झाला. त्याने बिबट्याचा हा थरार पाहिला. मात्र पुढच्या काही क्षणांत बिबट्याने पेट्रोल पंपावरुन धूम ठोकली. यावेळी कर्मचाऱ्याची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली होती.

(Aurangabad Kannad leopard Entry Viral Video)

हे ही वाचा :

Video : पेट्रोल पंपावर बिबट्या शिरला, कर्मचाऱ्याची पाचावर धारण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा….!