घरच्यांशी असा काय वाद झाला, तिनं पोलिस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलं… औरंगाबादेत काय घडलं?

ही महिला आणि तिच्या पतीचे काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र आज असं काय घडलं की एकाएकी महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घरच्यांशी असा काय वाद झाला, तिनं पोलिस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलं... औरंगाबादेत काय घडलं?
औरंगाबाद पोलीस आय़ुक्तालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 2:58 PM

औरंगाबादः शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर (police commissioner) एक गंभीर घटना घडली.12 वाजेच्या सुमारास या महिलेने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला. काही क्षणात स्वतःला पेटवून (Set on fire) घेतले. हे पाहून घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेला सध्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कौटुंबिक वादाचं कारण?

सदर प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती असी की, या घटनेमागे काही कौटुंबिक कारण आहे. ही महिला आणि तिच्या पतीचे काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र आज असं काय घडलं की एकाएकी महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या घाटी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत, पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच अशी घटना घडल्याने शहरात काही काळ खळबळ माजली.