Crime | औरंगाबादेत मोठी कारवाई, बिडकीनमध्ये 37 लाखांचा गुटख्याचा साठा पकडला

या करावाईत अटक कऱण्यात आलेला एक आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे. एवढा मोठा गुटख्याचा साठा कुठून आला, या प्रकाराला कुणाचं पाठबळ आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Crime | औरंगाबादेत मोठी कारवाई, बिडकीनमध्ये 37 लाखांचा गुटख्याचा साठा पकडला
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 3:09 PM

औरंगाबादः औरंगाबाद ग्रामीण पोलिस (Aurangabad police) आणि स्थानिक गुन्हे शाखा (Crime Branch) यांनी संयुक्त रित्या कारवाई करत अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन (Bidkin) येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल 37 लाख 59 हजार 384 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे छाप्यात पकडलेल्या आरोपींना यापूर्वीही अनेकदा गुटखा विक्री करताना पकडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावेळी मात्र पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे.

तब्बल 37 लाख 59 हजार रुपयांचा साठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद गुन्हे शाखा आणि बिडकीन पोलिसांनी छापे मारले. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांना छाप्याच्या ठिाकणी हिरापान मसाला, गोवा मसाला, विमल आणि राजनिवास अशा नावाच्या गुटख्याची पाकिटं जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

गुटखा साठेबाजीला कुणाचं पाठबळ?

पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईत, असलम हनिफ पठाण, युसूफ याकुब पठाण, परवेज रशिद पठाण आणि रिजवान मुख्तार शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या करावाईत अटक कऱण्यात आलेला एक आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे. एवढा मोठा गुटक्याचा साठा कुठून आला, या प्रकाराला कुणाचं पाठबळ आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या-

Video – Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?

Video | ‘डर्टी डझन रांगेत’ देशमुख मलिकांनंतर कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल