औरंगाबादेत मनसेची मोर्चेबांधणी जोमात, शहरात आणखी दोन शाखा, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

| Updated on: Jan 12, 2022 | 1:29 PM

आगामी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप अनिश्चितता असली तरीही मनसे मात्र स्थानिक पातळीवर कामाला लागली आहे. घराघरात मनसे असे ब्रीदवाक्य घेत औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणी करत आहेत.

औरंगाबादेत मनसेची मोर्चेबांधणी जोमात, शहरात आणखी दोन शाखा, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड
औरंगाबादेत मनसेच्या नव्या शाखेचे उद्घाटन
Follow us on

औरंगाबादः  आगामी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप अनिश्चितता असली तरीही मनसे मात्र स्थानिक पातळीवर कामाला लागली आहे. घराघरात मनसे असे ब्रीदवाक्य घेत औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणी करत आहेत.  नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात औरंगाबाद मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता दिसून येत होती. पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत बदल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांमधील मतभेद अधिक स्पष्ट दिसून येत होते. मात्र नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमार्फतही पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीचे काम वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

प्रगती कॉलनी आणि भडकल गेट परिसरात शाखा

महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन मजबुतीसाठी शहरातील विविध भागात शाखा उघडण्यात येत आहेत. वार्ड क्रमांक 19 प्रगती कॉलनी व वार्ड क्रमांक 49 घाटी-भडकल गेट, येथील शाखेचे उदघाटन राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाअध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. वार्ड क्रमांक 19 प्रगती कॉलनीचे शाखा अध्यक्ष विजय गंगावणे, शाखा उपाध्यक्ष शुभम राउत, शाखा सचिव संदीप शेजवळ, सदस्य सचिन साळवे, मनोज सुरडकर, अरुण जगताप, प्रमोद मोरे, यांची तर वार्ड क्रमांक 49 घाटी-भडकल गेट येथील शाखा अध्यक्ष मंगेश दामोदर, शाखा उपाध्यक्ष संतोष वाडेकर, शाखा सचिव प्रभाकर सुरडकर, सदस्य अमोल शिंदे, विकी पाटील, साहेब जहागीरदार, सुनील जाधव, यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख उपस्थती म्हणून जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, शहराध्यक्ष गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, मा. विभागाध्यक्ष अशोक पवार पाटील, मा. विभाग अध्यक्ष सुरेंद्र वाडेकर, राहुल पाटील, प्रशांत दहीवाडकर, जॉन बोरगे, किरण जोगदंडे, किशोर मंत्री, मनोज भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Nashik|निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’चे परिवार संवाद; जिजाऊ जयंतीदिनी फोडला नारळ, काय आहे अभियान?

Happy Lohri 2022 | लोहरीनिमित्त तुमच्या मित्रांना संदेश पाठवून तुमचे नातेसंबंध अजून घट्ट करा