Aurangabad VIDEO | नारेगावातल्या भंगार गोदामाला भीषण आग, भले मोठे धुराचे लोट, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

आजूबाजूच्या नागरिकांनी सदर घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीचा भडकाच एवढा मोठा होता की, संपूर्ण गोदाम या आगीत जळून खाक झाले.

Aurangabad VIDEO | नारेगावातल्या भंगार गोदामाला भीषण आग, भले मोठे धुराचे लोट, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू
नारेगावातील गोदामाला भीषण आग
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 4:54 PM

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) नारेगाव परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. या उन्हामुळेच भंगाराच्या गोदामाला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नारेगाव परिसरातील भंगाराच्या गोदामाला आज शनिवारी दुपारी ही आग लागली असून ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमक दलाचे (Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीचे स्वरुपच एवढे भीषण आहे की पाहणाऱ्यालाही धडकी भरत आहे.

लांबच लांब धुराचे लोट

औरंगाबाद शहरात भंगार गोदामाला भीषण आग लागल्याचे दृश्य एवढे भयंकर होते की, परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही आग लागली. भंगाराच्या गोदामातून काळ्या धुराचे मोठ-मोठे लोट निघत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी सदर घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीचा भडकाच एवढा मोठा होता की, संपूर्ण गोदाम या आगीत जळून खाक झाले.

औरंगाबादचा पारा 41 अंशांवर

नारेगावातील गोदामाला लागलेल्या आगीचे कारण वाढलेला उष्मांक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून औरंगाबादच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी तर औरंगाबादमधील या मौसमातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. येथील कमाल तापमान 41.1 अंश सेल्सियस एवढे होते. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक बाहेर न पडता घरातच राहणे पसंत करत आहेत. दुपारी बारा वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

इतर बातम्या-

Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! इच्छुकांनी आपला अर्ज ‘या’ पत्त्यावर पाठवावा, ८ मे शेवटची तारीख