AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : अभिषेक शर्माचं नववर्षात फायर अर्धशतक,न्यूझीलंड विरुद्ध युवराजचा रेकॉर्ड ब्रेक

Abhishek Sharma Broke Yuvraj Singh Record : अभिषेक शर्मा याने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात युवराजचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अभिषेकने 24 सामन्यांआधीच युवराजला मागे टाकलं.

IND vs NZ : अभिषेक शर्माचं नववर्षात फायर अर्धशतक,न्यूझीलंड विरुद्ध युवराजचा रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma IND vs NZ 1st T20iImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jan 21, 2026 | 9:28 PM
Share

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने 2026 या वर्षात अप्रतिम सुरुवात केली आहे. अभिषेक शर्मा याने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. अभिषेकने या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने या अर्धशतकी खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरण्यासह मोठा कारनामा केला आहे. अभिषेकने त्याचा गुरु आणि भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

अभिषेकने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरला

न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताकडून अभिषेक आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र न्यूझीलंडने भारताला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. न्यूझीलंडने संजू सॅमसन आणि त्यानंतर इशान किशन या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. संजूने 10 तर इशानने 8 धावा केल्या. त्यामुळे भारताची 2.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 27 अशी स्थिती झाली. त्यानंतर अभिषेकने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरला.

अभिषेक-सूर्याची निर्णायक भागीदारी

अभिषेक आणि सूर्या या दोघांनी दोन्ही बाजूने फटकेबाजी करुन धावांची भरपाई केली आणि भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. अभिषेकने या दरम्यान ग्लेन फिलिप्स याने टाकलेल्या आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक झळकावलं. अभिषेक यासह 2026 मध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने अर्धशतकापर्यंत पोहचण्यासाठी अवघ्या 22 चेंडूंचा सामना केला. अभिषेकच्या टी 20i कारकीर्दीतील हे सातवं अर्धशतक ठरलं. अभिषेकने 227.27 च्या स्ट्राईक रेटने 22 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. अभिषेकने या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले.

अभिषेकची फायर खेळी

युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक

अभिषेकने या खेळीदरम्यान युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला. अभिषेकने युवराजला टी 20i मधील षटकारांबाबत मागे टाकलं. युवराजला मागे टाकण्यासाठी अभिषेकला या सामन्याआधी 2 षटकारांची गरज होती. अभिषेकने कायल जेमिसन याने टाकलेल्या पाचव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स लगावला. यासह अभिषेकने युवराजला टी 20i सिक्सबाबत मागे टाकलं. अभिषेक शर्मा याने 34 टी 20i सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर युवराजने 58 सामन्यांमध्ये 74 षटकार लगावले होते.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार