Aurangabad | नळांच्या नव्या मीटरचे 13 कोटी वाचले, मनपाकडून खरेदीचा निर्णय रद्द, काय घडलं कारण?

| Updated on: Mar 31, 2022 | 6:00 AM

महापालिकेने समांतर जलवाहिनी योजनेच्या काळात खरेदी केलेले मीटर सध्या गारखेडा परिसरातील गोदामात पडून आहेत. या मीटरची आधी चाचणी केली जाईल, त्यानंतर ते वापरण्याचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad | नळांच्या नव्या मीटरचे 13 कोटी वाचले, मनपाकडून खरेदीचा निर्णय रद्द, काय घडलं कारण?
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः महापालिकेच्या (Municipal corporation) वतीने शहरातील व्यावसायिक नळांना मीटर (water meter) लावण्यासाठी १३ कोटी रुपयांची खरेदी प्रक्रिया मनपाने रद्द केली आहे. शहरात सध्या 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. याअंतर्गत काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या (Smart city) माध्यमातून तेरा कोटी रुपयांची खरेदी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासंदर्भात मीटर खरेदीची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र आता हा निर्णय मनपाने रद्द केला आहे. शहरातील नळांना सहा ते आठ दिवसांआड पाणी येते. त्यात पुन्हा मीटर लावणार, अशी ओरड नागरिकांकडून सुरु झाली होती. तसेच नव्या योजनेपूर्वी बंद पडलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेसाठीचे 5 हजार मीटर अद्याप तसेच पडून आहेत, असे विविध माध्यमांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महापालिकेने सदर खरेदी प्रक्रियाच रद्द केली आहे. आता यातील किती मीटर चालू आहेत, यासंदर्भातील चाचणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे.

5 हजार नळांसाठी 13 कोटींच्या खरेदीचा होता प्रस्ताव

महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील सुमारे 5 हजार व्यावसायिक नळांना मीटर बसवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 13 कोटी 16 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र महापालिकेने समांतर जलवाहिनी योजना राबवताना शहरातील नळांना मीटर बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मीटरच्या किंमतीवरून मोठा वाद झाला होता. त्यातच नळाला तीन दिवसाआड पाणी येत असताना मीटर बसवून काय साध्य होणार, असा सवालही करण्यात येत होता. आधी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करा, नंतर मीटर बसवा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच झालेल्या बैठकीत बंद पडलेल्या समांतर योजनेचे 5 हजार मीटर पडून असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता हे जुने मीटरच नव्या योजनेअंतर्गत वापरले जातील, असा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

गारखेड्यातील गोदामात जुने मीटर

महापालिकेने समांतर जलवाहिनी योजनेच्या काळात खरेदी केलेले मीटर सध्या गारखेडा परिसरातील गोदामात पडून आहेत. या मीटरची आधी चाचणी केली जाईल, त्यानंतर ते वापरण्याचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात महापालिकेच्या अधिकार्यांना माहिती कळवण्यात आली आहे.

इतर बातम्या-

नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा, काँग्रेसचे नेते Ashish Deshmukh यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Elephant : हत्तींची संख्या वाढत असल्याने शेतकरी चिंतेत, पर्यावरणवादी समाधानी; बागायतीचे नुकसान