रात्री घरफोडी, सकाळी ऐटीत कपडे खरेदी! औरंगाबाद पोलिसांनी 12 तासांच्या आत चोरांना हेरलं!

| Updated on: Jun 20, 2022 | 11:56 AM

पोलिसांच्या पथकाने बाजारपेठेतील महत्त्वाच्या दुकानासमोर सापळा रचून रवी सूरडकर आणि एका विधीसंघर्षग्रस्त मुलाला पकडलं. त्यांच्याकडून नथ, अंगठी, रोकड असा 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर यापैकी एकजण फरार झाला.

रात्री घरफोडी, सकाळी ऐटीत कपडे खरेदी! औरंगाबाद पोलिसांनी 12 तासांच्या आत चोरांना हेरलं!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः शहरातील वाढत्या चोऱ्या (thefts) आणि घरफोड्यांना (Burglary) आळा घालण्यासाठी पोलिसांनी सतर्कतेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या एका घरफोडीचा छडा पोलिसांनी अत्यंत शिताफीनं लावलं. मध्यरात्री एका कॉलनीतील घरात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. घरातील हजारोंचा मुद्देमाल आणि सोन्याचे दागिने (Golden jewelry) लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच कपडे खरेदीसाठी चोर बाहेर पडले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि चोराना हेरलं. अशा प्रकारे 12 तासांच्या आत चोरटे जेरबंद झाले. फक्त चोरी करणारे हे तिघे होते. त्यापैकी दोघांना पकडण्यात यश आलं तर तिसरा पसार झाला.

कुठे घडली घटना?

सदर घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील राजू आसाराम लोव्हाळे हे पत्नी आणि मुलासह 18 जूनच्या रात्री गावातीलच भावाच्या घरी गेले होते. रात्री उशीरा अडीच वाजता त्यांनी पुतण्याला सोबत घेऊन पत्नी आणि मुलीला घरी पाठवले. त्यावेळी घरी जाताच त्यांना कुलूप आणि कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी पाहणी केली असता चोरट्याने कपाटाचे लॉक तोडून एक तोळ्याचे झुंबर, एक तोळ्याची अंगठी, दोन ग्रॅमची नथ, तीन ग्रामचे टॉप्स, आदी सोन्याच्या वस्तूंसह 70 हजार रुपयांची रोकड पळवली. यावरून पुंडलिक नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरी करणाऱ्या त्रिकुटापैकी दोघे जेरबंद

गारखेडा परिसरातील ही घरफोडीची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस व गुन्हे शाखा कामाला लागली. गुन्हे शाखेच्या पथकाने खबरींनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु केला. यावेळी आरोपी कपडे खरेदी करायला आणि चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सराफा बाजारात येणार होते, अशी माहिती मिळाली. पथकाने बाजारपेठेतील महत्त्वाच्या दुकानासमोर सापळा रचून रवी सूरडकर आणि एका विधीसंघर्षग्रस्त मुलाला पकडलं. त्यांच्याकडून नथ, अंगठी, रोकड असा 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर यापैकी एकजण फरार झाला.

हे सुद्धा वाचा