AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad PHOTO | जगप्रसिद्ध कैलास लेणीचं मनोहारी रूप, जागतिक वारसा दिनी 300 प्रकाशझोतांनी उजळली, औरंगाबादकरांना अनोखी भेट

18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने नुकताच वेरूळ येथील कैलास लेणीच्या पायथ्याशी एक महोत्सव घेण्यात आला. यावेळी लेणी परिसरात 300 प्रकाशझोत लावण्यात आले होते.

Aurangabad PHOTO | जगप्रसिद्ध कैलास लेणीचं मनोहारी रूप, जागतिक वारसा दिनी 300 प्रकाशझोतांनी उजळली, औरंगाबादकरांना अनोखी भेट
Image Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 20, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबाद | उंच डोंगरावरून एकाच पाषाणात कोरलेली लेणी किंवा शिल्प हे वेरुळ येथील कैलास लेणीचं (Ellora Caves) वैशिष्ट्य. जगात अशी फक्त तीनच शिल्प आहेत. आफ्रिका, भारतातील तमिळनाडू आणि महाराष्ट्रात औरंगाबादमधील वेरुळ येथील ही लेणी. यामुळेच तर जगभरातील पर्यटक (Tourists) आणि अभ्यासकांना ही लेणी भुरळ घालते. औरंगाबादकर आणि पर्यटकांनी दिवसाच्या उजेडात या लेणीचं सौंदर्य डोळ्यात अनेकदा साठवलं असेल, मात्र रात्रीच्या मंद प्रकाशात कैलास लेणीतली शिल्प पाहण्याची संधी नुकतीच औरंगाबादकरांना मिळाली. निमित्त होतं जागतिक वारसा दिनाचं (World Heritage Day). पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने नुकताच या ठिकाणी एक महोत्सव घेण्यात आला. यावेळी कैलास लेणी परिसरात 300 प्रकाशझोत लावण्यात आले होते.

Aurangabad Ellora Caves

आधी कळस मग पाया या तत्त्वानुसार एकसंध पाषाणात वरून खालपर्यंत कोरण्यात आलेल्या या शिल्पाची अवघ्या जगाला भुरळ पडलेली आहे. युनेस्कोने जारी केलेल्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरुळचं नाव पहिल्या पाचात येतं.

Aurangabad Ellora Caves

दक्षिण आणि उत्तरेकडील वास्तु स्थापत्य शैलीचा हा उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूला दोन हत्ती आणि ध्वजस्तंभ कोरलेले आहेत.

Aurangabad Ellora Caves असं म्हणतात की, कैलास लेणी कोरताना यातून 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या परिसरात कुठेही हे दगड दिसत नाही. या दगडांचा वापर आजूबाजूची मंदिरं बांधण्यासाठी केला असावा, असा अंदाज इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad Ellora Caves

कैलास लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे, त्यात वरील बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपातही सुंदर कोरीव काम असून स्तंभही आहेत. मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूला भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis : भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमुळे हल्ले, फडणवीसांचा आरोप, तर सहानुभूतीचे प्रयत्न, मिटकरींचा पलटवार

Raj Thackeray | राज्याचं लक्ष औरंगाबादच्या सभेकडे, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी, पोलिसांची परवानगी मिळणार का?

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार