Devendra Fadnavis : भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमुळे हल्ले, फडणवीसांचा आरोप, तर सहानुभूतीचे प्रयत्न, मिटकरींचा पलटवार

येणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्हीकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशाचतच भाजपाच्या पोल खोल अभियानाला (BJP Polkhol Abhiyan) मंगळवारी सुरुवात करण्यात येणार होती, मात्र त्या आधी घडलेल्या एका घटनेवरून सध्या जोरदार वाद पेटला आहे.

Devendra Fadnavis : भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमुळे हल्ले, फडणवीसांचा आरोप, तर सहानुभूतीचे प्रयत्न, मिटकरींचा पलटवार
भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमुळे हल्ले, फडणवीसांचा आरोपImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:17 PM

मुंबई : मुंबई महापालिका (BMC Election 2022) निवडणुकीआधी भाजप आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामने आली आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्हीकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशाचतच भाजपाच्या पोल खोल अभियानाला (BJP Polkhol Abhiyan) मंगळवारी सुरुवात करण्यात येणार होती, मात्र त्या आधी घडलेल्या एका घटनेवरून सध्या जोरदार वाद पेटला आहे. भाजपच्या या पोलखोल अभियानाची अज्ञातांकडून तोडफडो करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी भाजपने मोठ्या प्रमाणांचा वाहनांचा ताफा तयार केला आहे. अगदी स्क्रीन लावण्यापासून ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सज्ज केले आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचेही भाजप नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. मात्र त्याआधी घडलेल्या या तोडफोडीच्या घटनेने नव्या वादाला आणि आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.

भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे अस्वस्थ

या रथाची काच फोडल्याच्या घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. हा हल्ला कुणी केला हे कायदा आणि सुवस्था ज्या महाविकास आघाडीकडे आहे, तेच याबाबत सांगू शकतील. मात्र ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत, ते पाहून त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत आहे. म्हणून आमच्यावर हल्ले सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहेत. तसेच आम्ही तरीही भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

भिती हा शब्द आमच्या कोशात नाही

या हल्ल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, याबाबत सरकारमधील प्रतिनिधीच सांगू शकतील. मी काही सांगू शकणार नाही. मला याबाबत काहीही माहिती नाही. तसेच शिवसेना आणि भीती हे काधी होऊच शकत नाही, त्यामुळे भाजपला घाबरून शिवसेना असे करणार नाही. भीती हा शब्द शिवसेनेच्या कोशातच नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.

भाजपचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

याच घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. हे सर्व सहानुभूती मिळवण्यासाठी केलं गेलं आहे, असे म्हणत मिटकरी यांनी हल्लाबोल चढवला आहे.

Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

bjp pol khol campaign: कुठल्या तरी गर्दुल्याला किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार हे चालणार नाही, प्रवीण दरेकर यांचा इशारा

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.