Cm Uddhav Thackeray : भाजपचा आक्रोश सत्तेसाठी, औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी नाही, फडणवीसांच्या मोर्च्याचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार

| Updated on: Jun 08, 2022 | 9:03 PM

मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला... तो आक्रोश त्यांचा सत्ता गेली होती म्हणून होता पाण्यासाठी नव्हता, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या मोर्च्याचा समाचार घेतला आहे, तसेच मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. असेही ते म्हणाले.

Cm Uddhav Thackeray : भाजपचा आक्रोश सत्तेसाठी, औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी नाही, फडणवीसांच्या मोर्च्याचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबाद : आज बहुचर्चित मुख्यमंत्र्यांची (Cm Uddhav Thackeray) भव्य सभा ही औरंगाबादेत (Aurangabad) पार पडली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी औरंगाबादच्या पाणीप्रश्नाला हात घातला आणि काही दिवसांपूर्वी काढलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मोर्च्यावरही यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला.  मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला… तो आक्रोश त्यांचा सत्ता गेली होती म्हणून होता पाण्यासाठी नव्हता, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या मोर्च्याचा समाचार घेतला आहे, तसेच मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे. तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. पण सुधारणा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला. अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे. मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल. विध्वसंक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे

तर त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करतानाच नेहमीच्या स्टाईलने, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता, बंधू आणि भगिनिंनो…म्हणत सुरूवात केली. त्यानंतर आज जवळपास सहा महिन्यानंतर मुंबईबाहेर पाऊल टाकलं. आणि सगळ्यात पहिल्यांना शिवसेनाप्रमुखांच्या लाडक्या संभाजीनगरात आलोत. जिकडे पाहावं तिकडे लोकच लोक आहेत. संभाजीनगरची पहिली महापालिका जिंकलो तेव्हा इथली सभा मी बाजूच्या इमारतीवरुन पाहत होतो. इतका काळ लोटला पण आजही तोच उत्साह, तोच भगवा दिसतोय. आपल्याकडे आता मैदान पुरत नाही अशी आपली ताकद वाढत आहे. आज आपल्या रुपात तुळजाभवानीचं दर्शन घेत आहेत. त्याच आईने आपल्याला विचार आणि साथी, सवंगडी आणि मर्द दिले आहेत, असे म्हणत मराठवाड्याचं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

ढेकणं चिरडायला तोफ लागत नाही

तर विरोधकांवर याच मुद्द्यावरून हल्लाबोल चढवताना ते म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ती ढेकणं आम्ही अशीच चिरडत असतो. तिकडे मला माझ्या सैनिकांची शक्तीही वाया घालवायची नाही. मी आज पहिल्यांदा मुद्दाम उल्लेख करणार आहे.. हिंदुत्वाचा तर आहेच.. ते तर आमच्या धमन्यांमध्ये आहे. पण मुद्दाम मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मीच एकटा मूर्ख असेल तिकडे पाणी प्रश्न असतानाही जनतेला सामोरा जात आहे. याचं काण कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. तुमच्या मनात हा प्रश्न असेल की तुम्ही सांगता ते आम्ही ऐकतो पण तुमचं वर्क्तृत्व आमच्या काय कामाचं? पण आता फरक पडला की नाही ते तुम्हीच सांगायचं आहे, असे आवाहनही त्यांनी औरंगाबादकरांना केलं आहे.

हातात दांडा घ्या, आडवा येईल त्याला सरळ करा

तसेच औरंगाबदच्या विकासकामांबाबत बोलताना ते म्हणाले,  जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय. तिच्यासाठीही पैसे देतोय. समांतर जलवाहिनीची भूमिपूजन मी केलं होतं. दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं. पण मी केंद्रकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा… पण आता किंमती वाढल्या आहेत… पण मी एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही. कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला तुंरुंगात टाकण्याचे आदेश मी दिले आहेत. असा इशारा त्यांंनी दिला आहे.