अश्लील ऑडिओ क्लीपवर आमदार संतोष बांगर यांचा मोठा खुलासा; म्हणाले,…

ही शिविगाळ अतिशय अश्लील आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत. त्यावर संतोष बांगर यांनी मोठा खुलासा केलाय.

अश्लील ऑडिओ क्लीपवर आमदार संतोष बांगर यांचा मोठा खुलासा; म्हणाले,...
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 7:02 PM

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एक व्हिडीओ क्लीप काल व्हायरल झाली. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे हे संतोष बांगर यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल केला. या ऑडिओ क्लीपमध्ये एका व्यक्तीशी बोलणं सुरू आहे. ते दोघेही बोलत असताना एकमेकांना शिविगाळ करतात. ही शिविगाळ अतिशय अश्लील आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत. त्यावर संतोष बांगर यांनी मोठा खुलासा केलाय.

ती ऑडिओ क्लीप माझी नाही

संतोष बांगर म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझी नाही. हे कट कारस्थान सुरू आहे. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक कलाकार आहेत. हा माझा आवाज कुणी तरी मिमिक्री केला आहे. मला बदनाम करण्याचं काम सुरू आहे.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न

तुम लाख कोशिश कर लो, मुझे बदनाम करने की, में जब भी बिखरा हु, दुगनी रफ्तार से निखरा हु।, अशी शेरोशायरी संतोष बांगर यांनी केली आहे. मी काय करतो हे मतदार संघात जाऊन पाहा. छोटं बाळसुद्धा सांगणार. मी काय काम केले आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अयोध्या पोळ यांना प्रत्यूत्तर

मला अनेक मतदार संघातून फोन येतात. त्यांना विचारा कुठल्या मतदार संघातला आहे. त्या महिला ताईला सांगतो माझा जप करू नको. देवाचा जप कर. तुला यश मिळणार असे प्रत्युत्तर संतोष बांगर यांनी अयोध्या पोळ यांना दिले. अयोध्या पोळ यांनी ऑडिओ क्लीप ट्वीट करून संतोष बांगर यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

त्या क्लीपची कुणी मिमीक्री केली?

त्यावर बोलताना संतोष बांगर म्हणाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तो माझा आवाज नव्हता. पुन्हा मीच निवडून येणार आहे. असे स्पष्टीकरण संतोष बांगर यांनी दिले. त्यामुळे मग, आता ती ऑडिओ क्लीप कुणी मिमीक्री केली का, याचा तपास होऊ शकतो.