Raj Thackeray: राज ठाकरेंवर भाषणातील ज्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाला, ते वक्तव्य नेमकं कोणतं?; एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

| Updated on: May 03, 2022 | 5:30 PM

Raj Thackeray: औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे, राजीव जेवळीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंवर भाषणातील ज्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाला, ते वक्तव्य नेमकं कोणतं?; एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
राज ठाकरे एकटेच मर्द, बाकी सगळे...,' कालीचरण महाराजांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले.. 'पुढच्या निवडणुकीत बघा काय होतं ते'
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत सुरुवातीला महाराष्ट्राची (maharashtra) ओळख करून देण्यासाठी शिवाजी महाराजांपूर्वीचा आणि नंतरचा इतिहास ऐकवला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा डेडलाईन दिली आणि भोंग्यावरून इशारेही दिले. राज ठाकरे यांचं भाषण सुरू होत असताना अजान सुरू झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना जाहीरपणे अजान बंद करण्याचं आवाहन केलं. त्याचवेळी त्यांनी चिथावणीखोर विधान केलं होतं. या विधानावरच पोलिसांनी आक्षेप घेतला असून राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा कशासाठी दाखल केला याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झाली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी पोलिसांना आवाहन केलं होतं. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्या वेळेला बांग देत असतील तर आपण आताच्या आता तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सहज सरळ मार्गाने यांना समजत नसेल तर त्याच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना सांगतो आताच्या आता जाऊन पहिल्यांदा हे बंद करा. माझं एक म्हणणं आहे या बाबतीत त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल ना एकदा काय ते तिच्या आयला होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या विधानावरच पोलिसांनी आक्षेप घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणते गुन्हे दाखल

औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे, राजीव जेवळीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 116,117,153 भादवि 1973 सह कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.