AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला ‘या’ तपायंत्रणेची नोटीस; काय आहे प्रकरण?

भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवशक्ती यात्रा यशस्वी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या कारखान्याला नोटीस आली आहे.

पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला 'या' तपायंत्रणेची नोटीस; काय आहे प्रकरण?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2023 | 10:56 AM
Share

बीड | 25 सप्टेंबर 2023 : शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी काही विधाने केली होती. आपल्याच पक्षाला सुनावणारी ती विधाने होती. खासकरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा यांनी आपल्याच पक्षाला चांगलं घेरलं होतं. त्यांच्या या शिवशक्ती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्या महाराष्ट्रातील राजकारणात कमबॅक करतील असं सांगितलं जात होतं. या चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी एक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. यावेळी जीएसटी विभागाने काही कागदपत्रे जप्त केली होती. हे कागदपत्र तपासले होते. यावेळी या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या या कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

19 कोटी रुपयांचा कर बुडवला

याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडून त्यावर काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मालमत्ता सील

दरम्यान, या आधीच युनियन बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालय अधिक सक्रिय झाल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

म्हणून कारवाई झाली असेल

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस आल्याने त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रमध्ये फिरल्या, त्यामुळे कारवाई सुरू झाली असेल असं मला वाटते, असा संशय बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत