Aurangabad : आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जाहिरातबाजी, नव्या वादाला तोंड

औरंगाबादेत शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळेंच्या जाहिरातीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Aurangabad : आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जाहिरातबाजी, नव्या वादाला तोंड
शिवसेनेची जाहिरातबाजी
Image Credit source: tv9
Reporter Datta Kanwate | Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 08, 2022 | 10:17 AM

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thcakeray) यांची आज औरंगाबादमध्ये (aurangabad) सभा आहे. या सभेपूर्वी अनेक घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री कुणावर टीका करणार? राज ठाकरेंना काय उत्तर देणार? औरंगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्री काही बोलणार का? भाजपवर आजच्या सभेतून काय टीका करणार? याकडे अवघ्या राज्याच लक्ष लागून आहे. सभेपूर्वी औरंगाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं देखील नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेकडं विशेष लक्ष लागून आहे. दरम्यान, सभेपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक (Shivsena Corporator) चेतन कांबळे यांच्या जाहिरातीची (Advertisement) औरंगाबादेत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये  पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये 5 डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, 100 पीएसआय आणि 1200 पोलीस असणार आहे. तर एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या याठिकाणी तैनात असतील. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निगरानीखाली हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. आज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग कमान, भडकल गेटशेजारील आयटीआय मुलींचे हायस्कूल ते खडकेश्वर टी पॉइंट, मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक- औरंगपुरा, ज्युबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता आणि आशा ऑप्टिकल्स ते सभा मैदानाकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी मिल कॉर्नर ते भडकल गेट असा रस्ता वापरता येईल.

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी शिवसेनेची नियमावली

  1. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तसेच जळगाव जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी हर्सुल सावंगी बायपास मार्गे केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड नाका, देवळाली चौक, गोदावरी चौक, एम आय टी कॉलेज महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन कडून आपली वाहने कर्णपुरा पार्किंग व आयोध्या नगरी पार्किंग याठिकाणी पार्किंग करावी
  2. जालना तसेच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी केंब्रिज नाका, झाल्ता फाटा, बीड नाका, देवळाली चौक,एम आय टी, महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाने येऊन अयोध्या नगरी व कर्णपुरा या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावीत
  3. नवीन धुळे सोलापूर हायवे वरून अंबड, बीड कडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने कांचनवाडी येथुन महानुभाव आश्रम, रेल्वे स्टेशन येथून आपली वाहने अयोध्या नगरी व कर्णपुरा पार्किंग येथे पार्क करावीत
  4. कन्नड व वैजापूर या तालुक्यातुन सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने, AS क्लब, नगर नाका, लोखंडी पूल या मार्गे येऊन कर्णपुरा पार्किंग या ठिकाणी पार्किंग करावीत
  5. बाहेरुन जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पक्षातर्फे दिलेले स्टिकर व झेंडे गाडीवर समोरील दर्शनी भागात लावून यावे,
  6. बाहेर जिल्ह्यातून येणारी वाहने यांनी आपली वाहने व्यवस्थित कर्णपुरा व अयोध्या नगरी येथे पार्किंग करावीत
  7. आपल्या वाहनामुळे इतर वाहनांना पार्किंग करण्यास व पार्किंग मधून गाडी घेऊन जाण्यास अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी
  8. कुठेही रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या पार्क करू नये
  9. पोलिसांनी दाखवलेल्या रस्त्यानेच वाहने घेऊन पार्किंग कडे यावीत, विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालू नये
  10. पार्किंग ची माहिती होण्यासाठी विविध पॉइंटवर नेमलेल्या पोलीस अंमलदार यांची मदत घेणे, वाहने पार्किंग केल्यानंतर ती व्यवस्थित लॉक करावीत शक्य असल्यास ड्रायव्हर वाहना जवळ ठेवावेत
  11. सभेकरिता येणाऱ्या नागरिकांनी सभा संपल्यावर व सभेसाठी जाताना आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे किंवा नागरिकांशी हुज्जत घालू नये असे प्रकार करू नये.
  12. कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता पोलिसांच्या कोणत्याही सूचनेकडे दुर्लक्ष करणार नाही, त्या सूचनांचे उल्लंघन करणार नाही
  13. बाहेरगावच्या कार्यकर्त्यांनी सभेसाठी येताना व जाताना ज्या ठिकाणी कोणत्याही हॉटेल वर आपण चहा-नाश्ता जेवणासाठी थांबल्यास, आपली व पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने काटेकोर वर्तन ठेवावे…
  14. सभेच्या दरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये.
  15. सभेच्या ठिकानी कोणतीही सूचना असल्यास जवळच्या पोलिसांकडे व्यक्त करावी.
  16. सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी रांगेचे पालन करावे.
  17. सभेला येणाऱ्या महिलांचा योग्य तो आदर करावा..
  18. सभा संपल्यानंतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अगोदर जाऊ द्यावे. त्यानंतरच पुरुषांनी निघायचे आहे म्हणजे वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत राहील,
  19. या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित ठेवण्यासाठी पोलिस विभाग अत्यंत खडतर परिश्रम घेत आहे.. आपल्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी…
  20. सभेसाठी येताना जाताना वाहनांच्या मागे जर एखादी अॅम्बुलन्स रुग्णवाहिका आल्यास तिला सर्वप्रथम रस्ता मोकळा करून द्यावा. या सोबत वाहतूक नियोजन, पार्किंग याचा नकाशा जोडला आहे त्यानुसार पालन करावे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us