
औरंगाबाद : लग्नासाठी बायको मिळत नसल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने थेट कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांना फोन केला. माझ्या घरचं शेतीवाडी सगळ बर आहे. मला लग्नासाठी मुलगी भेटत नाही. काहीतरी करा असा प्रश्न केला. यावर शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनीही तुझा बायोडाटा पाठवं, अशी प्रतिक्रिया देऊन मुश्किल उत्तर दिलं. लग्नासाठी मुलीचं भेटत नसल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्याचीच एक ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
ऑडिओ क्लीपमधील संवाद
तरुण – साहेब, जय महाराष्ट्र. रत्नपूरवरून बोलतो साहेब. विजय होळकर ग्रामीणमधून. घरी चांगली परिस्थिती आहे आपल्या. घरी आठ-नऊ एकर जमीन आहे. पण, इकडं लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही.
आमदार – जय महाराष्ट्र. बोला. कुठं.
तरुण – खुलताबाद, रत्नापूर म्हणजे भद्रा मारोती.
आमदार – तुमचा बायोडाटा पाठवून द्या.
तरुण – रत्नापूरवरून खाली सहा किलोमीटर गाव आहे.
आमदार – ठीक आहे. बायोडाटा पाठवून द्या.
तरुण – परिस्थिती चांगली आहे साहेब. विकासभाऊच्या किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवू का. तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत.
अशी या संवादाची क्लीप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लीप सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे.
अशी या संवादाची क्लीप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लीप सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे.
घरी शेती असली तरी मुलगी द्यायला कोणी तयार नाही. अशी परिस्थिती दिसते. त्यामुळं मुलाला चक्क आमदार महोदयांना फोन करावा लागला.
आमदार राजपूत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बायोडाटा पाठविण्यासाठी सांगितलं. त्यामुळं या आमदारांच्या माध्यमातून या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळेल, अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.