AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सर्वात मोठ्या घोषणा; सरकारला घाम फुटणार?

मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात तीन मोठ्या घोषणा केल्या. यात प्रत्येक घरात 'मराठा सेवक' तयार करणे, कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क क्रमांक देणे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या या घोषणांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकारवर दबाव वाढला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सर्वात मोठ्या घोषणा; सरकारला घाम फुटणार?
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 2:02 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आज बीडच्या नारायण गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी आज सर्वात मोठ्या तीन घोषणा केल्या आहेत. यातील एक घोषणा तर सरकारला घाम फोडणारी आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ही मागणी आहे. कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी ही घोषणा आहे. त्यामुळे येत्या काळात जरांगे पाटील हे आक्रमक होताना दिसणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आज हजारो मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तीन वर्षापासून समाज संघर्ष करत आहे. समाज आणि समाजाचे लेकरंबाळं महत्त्वाचे आहेत. कोणत्याही पक्षातील मराठा नेत्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठा समाज त्याच्या संकटावर पांघरून घालतो. समाजाने या नेत्यांना सोडलं तर यांना तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे समाज मोठा झाला पाहिजे. समाजातील मुलं मोठी झाली पाहिजे. समाज बरबाद झाला तर आपण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

समाजाचा हा आक्रोश कशासाठी आहे? या राज्यातील समाज मोठा व्हावा म्हणून हा आक्रोश आहे. ही झुंज आहे, असं सांगतानाच पहिलं काम सांगतो ते तुम्ही आणि आम्ही करायचं आहे. पहिलं काम म्हणजे घराघरातील तरुणांनी मराठा सेवक व्हायचं आहे. दुसरं काम म्हणजे कुणबी नोंदी आणि एसीबीसी आरक्षणाशी संबंधित आहे. तिसरं काम समाजाच्या समस्यांशी संबंधित आहे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येक घरात मराठा सेवक

विजयादशमीनंतर राज्यातील प्रत्येक घरातील ज्या व्यक्तीला मराठा सेवक व्हायचं आहे, त्याच्यासाठी 22 तारखेला मोबाईल नंबर दिला जाईल. त्यावर तुमची नोंदणी करायची आहे. आता घराघरातील व्यक्ती मराठा सेवक होऊ शकतो. मराठा समाज त्या मराठा सेवकासाठी काम करेल. तुम्हाला नंबर दिला जाईल. त्यावर फक्त मराठा सेवक म्हणून नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवायचा. फोन करायचे नाहीत, अशी सूचना त्यांनी केली.

अधिकाऱ्यांना बघतोच

दुसरं म्हणजे, कुणबी नोंदी सापडल्या. पण प्रमाणपत्र दिले जात नाही. अर्ज स्वीकारले जात नाही. अर्ज केले तर कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. व्हॅलिडीटी दिली जात नाही. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी दुसरा नंबर दिला जाईल. त्यावर फक्त आरक्षणाचाच विषय टाकायचा आहे. त्या बाबतच्या समस्या टाकायच्या आहेत. कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही ते बघतोच आम्ही, असा इशाराच त्यांनी दिला. तिसरं म्हणजे, मराठा समाजाच्या सर्व अडीअडचणीसाठी मोबाईल नंबर देणार आहे. यावर फोन करायचा नाही. या नंबरवर फक्त समस्या मांडायच्या आहेत, असं ते म्हणाले.

Follow Us
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ