AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उलट्यांचा त्रास… मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, दिवसभर उन्हात बसल्याचा फटका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. दिवसभर उन्हात बसल्याने मनोज जरांगे यांना रात्रीच्यावेळी उलट्या सुरू झाल्या. चक्कर यायला लागली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या पथकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांची ततपासणी केली.

उलट्यांचा त्रास... मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, दिवसभर उन्हात बसल्याचा फटका
manoj jarangeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2026 | 12:53 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. दिवसभर उन्हात बसल्याने मनोज जरांगे यांना रात्रीच्यावेळी उलट्या सुरू झाल्या. गरगरल्या सारखं वाटू लागलं. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या पथकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांची ततपासणी केली. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे.

मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवली सराटीत उपोषणाला बसले होते. एका शेतात बाज टाकून रणरणत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी डोक्याला फक्त एक मुंडासे बांधले होते. पाण्याचा एक थेंबही त्यांनी दिवसभर घेतला नाही. 35 डिग्री सेल्सिअसच्यावर तापमान होते. त्या रणरणत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले. दिवसभर उन्हात बसल्याने त्यांना काही झालं नाही. रात्री मात्र त्याचा असर जाणवू लागला.

थोडा त्रास झाला

रात्रीच्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना थोडा त्रास जाणवू लागला. त्यांना थोड्या उलट्या झाल्या. गरगरल्या सारखं वाटू लागलं. त्यामुळे वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेऊन मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. त्यांची शुगर तपासण्यात आली. रक्तदाबही चेक करण्यात आला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

रात्री उशिरापर्यंत चर्चा

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा सुरू केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना पुन्हा एकदा मागण्या मंजूर केल्याचा मसुदा दिला. जरांगे पाटील यांनी अभ्यासकांशी चर्चा करून सरकारला काही सूचनाही केल्या. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. यावेळी मनोज जरांगे अभ्यासकांना सर्व मुद्दे ऐकवत होते. त्यावर त्यांची मान्यता घेत होते. जे मुद्दे मान्य नाहीत ते सरकारला सांगत होते. त्यात दुरुस्त करण्यास सांगत होते. विखे पाटीलही काही मुद्द्यांचं निरसन करत होते. तसेच काही मुद्द्यांबाबत अधिक स्पष्टतता देत होते. जरांगेही काही मुद्द्यांना मान्य करत होते.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट