लव्ह जिहाद, बांगलादेश आणि नरेटिव्ह… जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बमध्ये काय काय? मोठी खळबळ

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 'ऑडिओ बॉम्ब'ने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या क्लिपमध्ये लव्ह जिहाद, धर्मांतर, बांगलादेश आणि राजकीय नरेटिव्ह सेट करण्यावर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. भाजप आणि शिंदे गटासाठी ही क्लिप मोठी डोकेदुखी ठरू शकते.

लव्ह जिहाद, बांगलादेश आणि नरेटिव्ह... जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बमध्ये काय काय? मोठी खळबळ
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 3:09 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बॉम्ब फोडून भाजप आणि शिवसेनेला घाम फोडला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यात केवळ 500 कोटी रुपयांचंच प्रकरण नाहीये तर इतर बऱ्याच धक्कादायक गोष्टी आहेत. या क्लिपमध्ये चार पाच लोकांचं संभाषण असून त्यात ते लव्ह जिहाद, बांगलादेश आणि नरेटिव्ह सेट करण्याबाबत चर्चा करत आहेत. पुढची रणनीती ठरवताना दिसत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमुळे शिंदे गटापेक्षा भाजपच जास्त अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या क्लिपबाबत टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाहीये.

Loading...

क्लिपमधील संवाद

महिला : जे कामाचे विषय नाहीत, त्याकडे लक्ष नको द्यायला. पण त्याकडेच आपण लक्ष देत आहोत. जे कामाचे विषय आहेत, त्याकडे आपण पाहत नाही. श्रीरामपूरमध्ये एका एससी मुलीचं धर्मांतर केलं आहे. त्यावर अजून कोणी आवाज उठवला नाही. हे विषय पोलरायजेशन करणारे आहे. ते आपण पाहिले पाहिजे. आपल्याला असे विषय मोठे केले पाहिजे.

पहिला व्यक्ती : श्रीरामपूरचा विषय कळला. संभाजीनगरचा एक विषय आहे. त्यावर कुणीच मत व्यक्त केलं नाही

दुसरा व्यक्ती : लव्ह जिहादचा

पहिला : लव्ह जिहादचा, पूजा पवारचा आणि एका मुलाला मारलं तो. एका बँक कर्मचाऱ्याने मुस्लिम महिलेला गाडीवर नेऊन दुसऱ्या ब्रँचमध्ये सोडलं म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या आधी दोघे एकमेकांशी बोलत होतो म्हणून त्याला मारलं. पूजा पवारला मारणाराही मुसलमान. हे सर्व घडत असताना एकालाही निषेध करावा वाटत नाही. हे भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे.

महिला : एका पोस्टरवरून श्रीरामाचं नाव काढलं. त्यावर आपण काही बोलत नाही. आपण हा मुद्दा उचलत नाही.

दुसरा : मला काय वाटतं सुशीलजी, अजयजी पण आहेत. दोन मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. व्होट जिहादचं राजकारण आणि मुस्लिम आक्रमण हा एक मुद्दा. मराठा समाजाचं ओबीसीकरण करा, ही मागणी जरांगे करत आहेत. या दोन विषयाला घेऊन लोकांनी प्रचार केला पाहिजे. कॅम्पेन केलं पाहिजे. ठिकठिकाणी मिटिंग घेतली पाहिजे. असं काही केलं तर वातावरण ढवळून निघेल. प्रचंड मोठ्या सभा होतील असं नाही. पण प्लान करून कॅम्पेन केलं तर फायदा होईल. त्या गावात जायचं, सभा घ्यायची, बोंबाबोंब करायची.

महिला : पालघरमध्ये आपण चांगली तयारी केली आहे. मंडपात आपण चेक करूनच लोकांना घेत आहोत. एसपीजीही फोकसमध्ये आहे. आपण तयारी चांगली केली आहे. पण मुख्यमंत्री जाणााऱ्या मार्गातून झेंडा दाखवला तर काही करू शकत नाही.

पहिला : कम्युनिस्ट पार्टी तिथे आहे. त्यांनी वाढवणला विरोध केला आहे. विरोध करणारे देशविरोधी म्हणून प्रचार करता येईल.

दुसरा : अतुलजी एक विषय आहे. मार्गदर्शन करा. त्या लोकांनी विरोध करण्यापूर्वी आपण आजच कॅम्पेन केलं तर… महाराष्ट्रद्रोही ताकद पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार आहे, असं म्हटलं तर.

महिला : बांगलादेश करण्याची तयारी आतापासूनच सुरू आहे. अनेक गोष्टी जोडून बांगलादेश करण्याची तयारी सुरू आहे, असं म्हटलं तर… आपण या सर्व गोष्टी जोडल्या पाहिजे. शरद पवारांना हा भेटला, तमूक व्यक्तीला तो भेटला… असं इन्फ्ल्यूएन्सरच्या माध्यमातून चालवलं पाहिजे. अराजकता निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असं म्हटलं पाहिजे. आपण एक नरेटिव्ह सेट केला पाहिजे. तो चांगला होईल.

पहिला : विकासाच्या विरोधात हे लोक काम करत आहेत. हे आपण दाखवलं पाहिजे. विकासाला विरोध म्हणजे महाराष्ट्राला विरोध अशी कॅम्पेन करा.

दुसरा : काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पोस्ट करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us