सर्वात मोठी बातमी… माझ्याकडे एक बॉम्ब, दुसरा अणूबॉम्ब… मनोज जरांगेंचा मोठा दावा; महाराष्ट्रात मोठा भूकंप?

मनोज जरांगे पाटील यांनी 'बॉम्ब' आणि 'अणूबॉम्ब' ऑडिओ क्लिप्सचा खळबळजनक दावा केला आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे गटावर बदनामीचा आरोप करत त्यांनी हे दावे केले. राज ठाकरे यांचे कौतुक करत, जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले असून, त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी... माझ्याकडे एक बॉम्ब, दुसरा अणूबॉम्ब... मनोज जरांगेंचा मोठा दावा; महाराष्ट्रात मोठा भूकंप?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 12:34 PM

रामनाथ ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : त्या दिवशी ऐकवलेली ऑडिओ क्लिप काहीच नाही. माझ्याकडे आणखी एक बॉम्ब आहे. तो बॉम्ब झाल्यावर दुसरा अणूबॉम्ब आहे. माझ्यावरचे आरोप होऊ द्या. त्यानंतर हे दोन्ही बॉम्ब फोडतो, असा खळबळजनक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरागे यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. जरांगेंकडे असलेल्या या दोन्ही क्लिप कुणाच्या विरोधातील आहेत? त्यामुळे कुणाची खाट पडणार आहे? अशी चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंच्या लोकांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी खूप टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या टीम कार्यरत आहेत. या टीमकडून माझी बदनामी केली जात आहे. त्यांना आता बोलू द्या. त्यांना मी बरंच बोलू देणार आहे. नंतर मी एकदाच बॉम्ब काढतो. तुम्ही शिंदेंसाठी मला बदनाम करताय ना? मी बघा काय काय काढतो? असा इशाराच मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे गटाला दिला आहे.

Loading...

राज ठाकरे व्हिजन देणारा माणूस

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे बुद्धीवर जोर देऊन विकासाचं व्हिजन देणारा माणूस आहे. मी त्यांची काही भाषणं पाच सहा वर्षापूर्वी ऐकली आहेत. सत्य बोलून अमूक गोष्ट करायची हे सांगणारा हा माणूस आहे. पण जनता ऐकत नाही. लोक लबाडाचं जेवण जेवतात. राज ठाकरे मागे तळमळीने म्हणाले होते, मी एवढं तळमळीने सांगूनही मला मतदान पडत नाही. कशाने मदतान पडतं मला कळलंय. ते जे करतात तेच मान्य आहे का? मग आम्हालाही तेच करावं लागेल. इलाजच नाही. तुम्हाला खरं मान्यच करायचं नाही, असं राज ठाकरे पोटतिडकीने म्हणाले होते. राज ठाकरे कोणतीही गोष्ट मनाला पटल्याशिवाय बोलत नाहीत. एआय वगैरे काही नाही हे त्यांना माहीत आहे. जे षडयंत्र आहे ते भयंकर आहे. हे सत्यचं आहे, हेही राजसाहेबांना माहीत आहे, असं सांगतानाच सत्ताधापी सत्याकडे जाणार नाही. ते थोड्याच दिवसांनी माझ्या मागे लागतील. पण मी त्यांना पुरून उरणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

या क्लिपच्या आरोपातील ते शोध घेणार की नाही हे कळत नाही. मी त्यांची यंत्रणा कमजोर केली आहे. हा आपल्या गुप्त यंत्रणेच्या पुढचा निघाला. तो आपल्या यंत्रणेचं कंबरडं मोडू शकतो तर हे रसायन वेगळं आहे. हे पोरगं सोपं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे ते माझ्या मागे लागतील. मला दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत, असंही ते म्हणाले.

तर दुसरा फासा टाकणार

मनोज जरांगे कशाला 500 कोटी घेतील. जरांगे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांना जर काही हवं असतं तर ते राजकारणातच आले असते, असं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. त्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. सुधीर भाऊ बोलले म्हणून बोलत नाही. मी यापूर्वीही बोललो आहे. सुधीर भाऊंनी पक्ष वाढवला. त्यांची अवस्था काय केली आहे? ते विधानसभेत पक्षाच्या विरोधातही बोलतात. त्यांच्या मनातील तळमळ महाराष्ट्र बघतो. ते सत्य सांगणारे नेते आहेत. पण आजच्या भाजपला ते पटत नाही. मला वाटतं शिंदे आणि फडणवीस या सर्वांचं ऐकून या प्रकरणाच्या मुळाशी जातील. ते मराठ्यांवर डाव टाकणार नाही असं वाटतं. टाकला तर मी दुसरा फासा टाकायला मोकळा आहे आणि पक्का आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us