AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलकांसाठी मोठी खूश खबर… थेट जिल्हाधिकाऱ्यानेच दिले आदेश; मोठा निर्णय काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान जालना जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत करण्याकरिता एक हेल्पलाइन कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष नागरिकांना मार्गदर्शन करेल, आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया समजावून सांगेल. जरांगे यांच्यासाठी ही एक मोठी सकारात्मक घडामोड असून, मराठा आरक्षणाच्या मागणीला यामुळे बळ मिळेल, असे मानले जात आहे.

मराठा आंदोलकांसाठी मोठी खूश खबर... थेट जिल्हाधिकाऱ्यानेच दिले आदेश; मोठा निर्णय काय?
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 2:41 PM
Share

मनोज जरांगे पाटील उद्या पासून अंतरवली सराटीत शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करणार आहेत. त्यासाठी अंतरवलीत मोठी तयारी सुरू आहे. अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे जरांगे यांनी आंदोलन करू नये म्हणून सरकारनेही कंबर कसलेली आहे. पण जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आज संध्याकाळपर्यंत सरकारकडून ठोस काही निर्णय नाही घेतला गेल्यास जरांगे उद्यापासून आंदोलन करणार आहेत. एकीकडे जरांगे यांनी आंदोलनाची तयारी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन कक्ष तयार करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची खूश खबर असल्याचं मानलं जात आहे.

मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहे. मराठा-कुणबी,कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात माहिती, मार्गदर्शन अथवा अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधवा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे व पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हेल्पलाइन कक्षासाठी नव्याने नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे, तसेच महसूल सहाय्यक संदीप इंगळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेल्या पुराव्यांची माहिती उपलब्ध करून देणे, अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणे, उपलब्ध अभिलेखांमधून आवश्यक नोंदी शोधण्यास मदत करणे तसेच अर्जदारांच्या अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण हेल्पलाइन कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

मराठ्यांना हक्काच आरक्षण मिळेल

दरम्यान, राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि अन्य मंत्री हे परवाच जरांगे पाटलांना भेटून आले. त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री आणि सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असून यापूर्वी निर्णयही घेतलेले आहेत. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की, मराठ्यांना दिलेल आरक्षण हे कोर्टात टिकलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही आरक्षणाला धक्का बसता कामा नये, किंवा त्यांचं आरक्षण कमी करून द्यायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे. यात निश्चितच योग्य तोडगा निघेल. समिती अध्यक्ष विखे पाटील यांची माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांशी चर्चा झाली आहे. पूर्वी आरक्षणाला घेऊन जे वातावरण तंग झालं होतं, त्यात आता राज्य सरकार असो मुख्यमंत्री यशस्वी योग्य तोडगा काढेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी