काय सांगता? औरंगाबादेत मेट्रो धावणार… पुढच्या आठवड्यात कोणत्या मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवणार?

शहरातील डीएमआयसी ऑरिक सिटी ते वाळूज या दोन एमआयडीसीला मेट्रो रेल्वेने जोडण्याचा विचार महापालिका प्रशासन करते आहे. विशेष म्हणजे या स्थानांदरम्यानच्या मेट्रोचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याची तयारीही मनपाने केली आहे

काय सांगता? औरंगाबादेत मेट्रो धावणार... पुढच्या आठवड्यात कोणत्या मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवणार?
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 3:11 PM

औरंगाबादः मुंबई, पुणे, नागपूरप्रमाणे औरंगाबादकरांनाही येत्या काही वर्षात मेट्रोचा लाभ मिळू शकतो. शहरातील डीएमआयसी ऑरिक सिटी ते वाळूज या दोन एमआयडीसीला मेट्रो रेल्वेने (Aurangabad Metro) जोडण्याचा विचार महापालिका प्रशासन करते आहे. विशेष म्हणजे या स्थानांदरम्यानच्या मेट्रोचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याची तयारीही मनपाने केली आहे. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astikkumar Pandey) यांनी स्मार्ट सिटीकडे पीएमसी अर्थात प्रकल्प व्यवस्थापन संस्था नियुक्तीची जबाबदारी सोपवली आहे.

कोणत्या मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवणार?

शहरात पुढील आठवड्यात केंद्रीय पेट्रोलियम तथा नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी येणार आहेत. शहरातील गॅस पाइपलाइनच्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर शहरातील उद्योगसंघटना विकासाच्या दृष्टीने सादरीकरण करणार आहेत. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव पुरी यांच्यासमोर सादर करणार आहेत.

महापालिकेची तयारी काय?

मेट्रोचा डीपीआर जी प्रकल्प व्यवस्थापन संस्था तयार करते. त्या संस्थेचे खर्च महापालिकेला झेपणार नाही, असे लेखा विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर स्मार्ट सिटीकडून पीएमसी नेमली जाईल, असा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला. स्मार्ट सिटीनेही पीएमसी नियुक्तीची तयारी सुरु केली असून त्याचा प्रस्ताव लवकरच मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या-

Nagpur | उपमुख्यमंत्री ‘दादां’चा ठाकरे सरकारला विसर पडला?, राज्याच्या परिपत्रकात उल्लेखच नाही

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक