Nanded | धुळे, जालन्यानंतर नांदेडमध्येही तलवारी जप्त, 25 तलवारी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर कारवाई

काल धुळ्यातदेखील तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच जालन्यातदेखील 89 तलवारी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात कुठे घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Nanded | धुळे, जालन्यानंतर नांदेडमध्येही तलवारी जप्त, 25 तलवारी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर कारवाई
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 5:13 PM

नांदेडः महाराष्ट्रात आगामी महाराष्ट्र दिन, रमजान ईद आणि इतर राजकीय वादंगांमुळे संवेदनशील वातावरण असतानाच नांदेडमध्ये तब्बल 25 तलवारींचा (25 Sword) साठा जप्त करण्यात आल्या आहेत. एका ऑटो रिक्षातून या तलवारी नेण्यापोलिसांनी त येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, तपास केला असता शिवाजी नगर पोलिसांना हा शस्त्रसाठा सापडला. नांदेडमधील शिवाजीनगर (Shivaji Nagar Police) या रिक्षासह 25 तलवारी जप्त केल्या असून या इथे आणण्याचा नेमका उद्देश काय, या पाठिमागे कुणाचा हात आहे, याचा तपास आता केला जाणार आहे. अमृतसरहून सचखंड एक्सप्रेसने (Suchkhand Express) या तलवारी नांदेडमध्ये आल्याची माहिती मिळाली आहे.

पंजाबमधून तलवारी आल्या?

पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. सुरुवातीला आरोपी तलवारीच्या बाबतीत उडवाउडवीची उत्तरे देत होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. प्राथमिक चौकशीनुसार, पंजाबमधून ह्या तलवारी विकण्याच्या उद्देशाने आरोपींनी नांदेडल्या आणल्याचं समजतंय. दरम्यान, धुळे, जालना, पाठोपाठ आता नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी जप्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी कसून चौकशी सुरू असून पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी व्यक्त केलीय.

धुळे आणि जळगावातही तलवारी सापडल्या

आज नांदेडमध्ये तलवारी सापडल्याने खळबळ माजली आहे. तर काल धुळ्यातदेखील तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या. मुंबई- आग्रा हायवेवर पेट्रोलिंग करताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी पाठलाग करून तलवारी जप्त केल्या. त्याआधी जालन्यातदेखील 89 तलवारी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात कुठे घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.