AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळजवळ पुलावरील रस्ता अचानकपणे खचल्याची घटना घडली. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर घडली. वेरुळजवळील या पुलावर नव्याने रस्ता बनवलेला आहे.

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती
aurangabad_road_broke
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 7:48 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळजवळ रस्ता अचानकपणे खचल्याची घटना घडली. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील पुलावर घडली. वेरुळजवळील या पुलावर नव्याने रस्ता बनवलेला आहे. हाच रस्ता खचला आहे. पुलावरील या रस्त्यावर दहा फुटांपेक्षाही मोठा खड्डा पडला आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. (newly built road erode near Ellora in Aurangabad possibility of major accident)

तब्बल 10 फुटांपेक्षाही मोठा खड्डा पडला

मिळालेल्या माहितीनुसार धुळे-सोलापूर हायवे महामार्गावर वेरुळजवळ नव्याने रस्ता बांधण्यात आला आहे. याच महामार्गावर वेरुळजवळ एक पूल आहे. या पुलावर नव्याने बांधण्यात आलेला हा रस्ता अचाकनपणे खचला आहे. हा रस्ता खचल्यामुळे तब्बल 10 फुटांपेक्षाही मोठा खड्डा पडला आहे. या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. ही वाहने मोठ्या वेगात येजा करतात. मात्र, हा रस्ता खचल्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीती

या मार्गावर नव्यानेच रस्ता तयार करण्यात आला असला तरी तो खचल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. खचलेल्या पुलावरून वाहने गेल्यास पूल कोसळण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

पडेगावमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग

औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुसरी घटना घडली. औरंगाबादजवळच्या पडेगावमध्ये ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही वेळात स्थानिकांच्या मदतीने अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. पडेगावमधल्या लकी गादी कारखान्याला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि पुढच्या काहीच वेळात स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालं आहे. आगीमुळे या गादी कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीत कारखान्याचं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

इतर बातम्या :

पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील वैद्यनाथ कारखान्याला उतरती कळा, आधी नोटीस आता थेट पीएफ खातं बंदची कारवाई

Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी

गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, मेंढपाळाच्या पत्नीची छेडही काढली, पोलिसांत गुन्हा दाखल मात्र आरोपी मोकाट

(newly built road erode near Ellora in Aurangabad possibility of major accident)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.