Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी

Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी
सांकेतिक फोटो

15 जुलै रोजी औरंगाबादेतील बजाजनगरात येथील लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणासाठी येथे लोकांनी तुफान गर्दी केली होती.

दत्ता कानवटे

| Edited By: prajwal dhage

Jul 15, 2021 | 11:20 PM

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. असे असले तरी लसीच्या तुटवड्यामुळे ठिकठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. 15 जुलै रोजी औरंगाबादेतील बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणासाठी येथे लोकांनी तुफान गर्दी केली होती. (people making crowd on Bajaj Nagar Corona center due to lack of Corona vaccine)

300 टोकन वाटले तरी लोकांची  गर्दी

लसीकरणासाठी औरंगाबादेत ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. बजाजनगर भागात मोहटादेवी परिसरातसुद्धा एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, येथे आज लसीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोकांची गर्दी वाढल्यामुळे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना 300 टोकन वाटले. मात्र, तरीसुद्धा उरलेल्या नागरिकांचा केंद्रावर गोंधळ सुरूच होता. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी काही काळासाठी गोंधळून गेले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीसुद्धा या लसीकरण केंद्रावर अशाच प्रकारे गोंधळ उडाला होता. त्यावेळी येथे थेट पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

याच लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार वाळूजमध्ये 28 जून रोजी पहायला मिळाला होता. यात काही लोकांना किरकोळ इजासुद्धा झाली होती. या लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नव्हती. वाळूजमधील बजाजनगर लसीकरण केंद्रावर 28 आणि 29जून रोजी नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला होता. इथं लोक लस घेण्यासाठी आले होते. मात्र येथे होत असलेल्या गर्दीमुळे लस मिळण्याऐवजी कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

इतर बातम्या :

‘महाविकास आघाडीतील ‘शिक्षणसम्राट’ मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला’, भातखळकरांचा खोचक टोला

GST Compensation: केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी जाहीर, पुढचा हप्ता कधी मिळणार?

VIDEO : पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका, जिथे कोयता मिरवला त्याच परिसरातून वरात

(people making crowd on Bajaj Nagar Corona center due to lack of Corona vaccine)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें