टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप

टीव्ही 9 मराठीच्या बजाजनगर येथील लस तुटवड्याच्या बातमीनंतर आता येथे तत्काळ लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना टोकन वाटण्यात आले असून काहींचे आज लसीकरण झाले आहे.

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप
corona-vaccination

औरंगाबाद : लस तुटवडा निर्माण झाल्यामुळे रांग लावूनही टोकन मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या याच अडचणीला वाचा फोडण्याचे काम टीव्ही 9 मराठीने केले आहे. टीव्ही 9 मराठीच्या बजाजनगर येथील लस तुटवड्याच्या बातमीनंतर आता येथे तत्काळ लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना टोकन वाटण्यात आले असून काहींचे आज लसीकरण झाले आहे. तर काही नागरिकांना उद्या लस दिली जाईल. (government made vaccine availability after TV9 Marathi news on vaccine shortage in bajaj Nagar Aurangabad)

नेमका प्रकार काय ?

औरंगाबादमधील बजाजनगर येथील मोहटादेवी लसीकरण केंद्रावर अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, येथे मोजक्याच लस मिळत असल्यामुळे रोजच शेकडो नागरिकांना विनालसीचे घरी परतावे लागते. या लसीकरण केंद्रावर आजही (29 जून) हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

लस मिळण्यासाठी टोकन हवे म्हणून  मोहटादेवी लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. लसीकरण केंद्रावर लस शिल्लक नसल्याचा बोर्ड लावलेला असतानाही येथे नागरिक सकाळपासूनच थांबले होते. याच प्रकाराचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले होते. तसेच बातमीच्या माध्यमातून नागरिकांना लस मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, नागरिकांना टोकनचे वाटप

टीव्ही 9 मराठीने या प्रकाराची दखल घेत हा प्रश्न शासनदरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रशासनानेही जागे होत लगेच बजाजनगर लसीकरण केंद्रावर लससाठा उपलब्ध करुन दिला. तसेच येथे काही नागरिकांना टोकन देण्यात आले. टोकन मिळाल्यानंतर येथे काही नागरिकांना आज लस मिळाली असून काहींचे उद्या लसीकरण केले जाणार आहे.

लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार वाळूजमध्ये 28 जून रोजी पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजासुद्धा झाली. या लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नाही. वाळूजमधील बजाजनगर लसीकरण केंद्रावर आज नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला. इथं झालेल्या गर्दीमुळे लोक लस घेण्यासाठी आले होते, पण त्यांना कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं चित्र निर्माण झालं होतं.

इतर बातम्या :

भर कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि सुभाष देसाई यांच्यात नाराजीनाट्य, सत्कार कारण ठरला!

Video : आमदार अंबादास दानवेंनी फोडली वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकालाही दिला चोप!

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, लग्नानंतर मुलीच्या सुखासाठी आई-वडिलांनी हुंडा-सोनं दिलं, पण…

(government made vaccine availability after TV9 Marathi news on vaccine shortage in bajaj Nagar Aurangabad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI