भर कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि सुभाष देसाई यांच्यात नाराजीनाट्य, सत्कार कारण ठरला!

सुभाष देसाई आणि चंद्रकांत खैरे यांच्यात विसंवाद पाहायला मिळाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा विसंवाद पाहायला मिळाला. त्याला कारण ठरला सत्कार... देसाई यांच्या सत्कार करण्यावरून दोघांमध्ये विसंवाद झाला. | Chandrakant khaire And Subhash Desai

भर कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि सुभाष देसाई यांच्यात नाराजीनाट्य, सत्कार कारण ठरला!
सुभाष देसाई आणि चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांच्यात विसंवाद पाहायला मिळाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा विसंवाद पाहायला मिळाला. त्याला कारण ठरला सत्कार… देसाई यांच्या सत्कार करण्यावरून दोघांमध्ये विसंवाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाला उशीर होत असल्यामुळे देसाई सत्कारला नकार देत होते, मात्र खैरेंनी स्वभावाप्रमाणे आपलेच घोडे पुढे दामटले, साहजिक देसाई खैरेंवर चिडले. (Disagreement between Chandrakant khaire And Subhash Desai in Aurangabad Sardar vallabhbhai patel Statue)

नेमकं काय घडलं?

चंद्रकांत खैरे खासदार असताना त्यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहरात पार पडलं. या कार्यक्रमाला औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाला उशीर होत असल्याने सुभाष देसाई यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला मात्र चंद्रकांत खैरे यांनी बळजबरी केली खैरे ऐकत नसल्यामुळे सहाजिक सुभाष देसाई नाराज झाले.

खैरे यांचा सत्कार करताना नागरिकांकडे पाठ करण्यावरून देखील देसाई यांनी खैरेंना चांगलं सुनावलं. सरदार पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हा वाद पाहायला मिळाला. औरंगाबाद शहरात काल याच वादाची चर्चा होती.

एकीकडे कौतुक, दुसरीकडे नाराजी

खैरे यांनी खासदार असताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी दिला होता. आपल्या भाषणात सुभाष देसाई यांनी या निधीचा आवर्जून उल्लेख केला. तसेच चंद्रकांत खैरे यांचं कौतुक केलं. देसाई यांच्याकडून जाहीरपणे कौतुक झाल्यामुळे मात्र विरोधकांच्या भुवया उंचावल्या.

खैरेंच्याच हस्ते उद्घाटन होऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा देसाईंना निरोप

या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं अशी चंद्रकांत खैरे आणि औरंगाबादच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र कोरोना काळात गर्दी जमवणे योग्य नसल्याचे कारण सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होऊद्यात अशी सूचना केली असेही देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यावर खैरेंनी हात जोडत कृतज्ञता व्यक्त केली.

(Disagreement between Chandrakant khaire And Subhash Desai in Aurangabad Sardar vallabhbhai patel Statue)

हे ही वाचा :

रुटीन चेक-अप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात

‘भाजपची सत्ता असताना खडसेंकडे मंत्रिमंडळातील 10 खाती होती; ओबीसींचा यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो?’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI