Video : आमदार अंबादास दानवेंनी फोडली वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकालाही दिला चोप!

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्ट रिक्षाचालकाला चोपही दिला!

Video : आमदार अंबादास दानवेंनी फोडली वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकालाही दिला चोप!
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी वाहतूक कोंडी सोडवली
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 8:05 PM

औरंगाबाद : शहरातील प्रमुख चौक असलेल्या क्रांती चौकात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चौकातील चारही बाजूंनी चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्ट रिक्षाचालकाला चोपही दिला! (MLA Ambadas Danve clear the traffic at Kranti Chowk in Aurangabad)

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांवरुन औरंगाबादेतील नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. त्यामुळे दुपारी चार वाजेच्या आत घरी परतण्यासाठी औरंगाबादकरांची धावपळ पाहायला मिळाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या उतरल्यामुळे शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसालही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा जवळच्याच शिवसेना कार्यालयात उपस्थित असलेले आमदार महोदय क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली.

‘आमदार असलो तरी आधी शिवसैनिक’

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसह मी आणि शिवसैनिक प्रयत्न कलरत होतो. त्यावेळी एक बेशिस्त रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे त्याला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न आपण केला. मी आमदार आहे, पण आधी मी एक शिवसैनिक आहे. त्या रिक्षाचालकाचा बेशिस्तपणा पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला होता, अशा शब्दात दानवे यांनी रिक्षाचालकाला फटकावल्याचं समर्थन केलंय.

वाळूज लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेले लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार आज वाळूजमध्ये पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली. या लसीकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नाही. वाळूज लसीकरण केंद्रावर आज नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला. इथं झालेल्या गर्दीमुळे लोक लस घेण्यासाठी आले होते, पण त्यांना कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं चित्र निर्माण झालं होतं.

इतर बातम्या :

Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल

Video | रोडरोमिओंकडून पाठलाग, अश्लील हावभाव; धाकट्या बहिणीने भर रस्त्यात दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

MLA Ambadas Danve clear the traffic at Kranti Chowk in Aurangabad

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.