गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, मेंढपाळाच्या पत्नीची छेडही काढली, पोलिसांत गुन्हा दाखल मात्र आरोपी मोकाट

ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या गावगुंडांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना ही मारहाण झालीय.

गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, मेंढपाळाच्या पत्नीची छेडही काढली, पोलिसांत गुन्हा दाखल मात्र आरोपी मोकाट
औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना ही मारहाण झालीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

गावगुंडांचा मेंढपाळांवर हल्ला

गोदावरी नदीच्या परिसरात मेंढपाळ मेंढ्या चारत होते. त्यावेळी तिथे जवळपास 10 ते 15 गावगुंड हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. त्यांनी थेट मेंढपाळांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चार-पाच मेंढपाळ जबर जखमी झाले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी मोकाट

मारहाण करणाऱ्या तरुणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक झालेली नाहीय. अजूनही गावगुंड मोकाट आहेत. मेंढपाळांनी पोलिसांवर आरोप करपत पोलिस आरोपींना मिळालेले आहेत, ते योग्य प्रकारे तपास करत नाहीत, असा आरोप केला आहे.

मेंढपाळांचं म्हणणं काय?

30 जून रोजी आम्ही गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर तालुक्यात सावखेडा शिवारातील नदीच्या काठावर शासनाने संपादित केलेल्या शेतात कुटुंबासह इतर सहकार्‍यांसोबत मेंढ्या चारत असताना दुपारी तीनच्या वेळी तीस ते पस्तीस मुले हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले व माझ्या सहकाऱ्यांना आणि पत्नीला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझी पत्नी भांडण सोडवायला आली असता तिचा ब्लाउज फाडून तिच्याशी छेडछाड केली, असा आरोप भाऊसाहेब खरात (वय वर्षे 40) यांनी केला आहे.

पीडित मेंढपाळाचं थेट औरंगाबाद पोलिस महानिरीक्षकांना पत्र

आम्ही बाहेरील असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांना हाताशी धरून आरोपींना साथ दिलेली आहे. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींशी हातमिळवणी करून गुन्ह्याचे स्वरूप कमी केलेलं आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणं गरजेचं होतं, परंतु तीही जप्त केली नाहीत. तक्रार घेताना फक्त पाच आरोपींची नाव घेऊन इतर आरोपींची नावे जाणून-बुजून घेतली जात नाहीयत. माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय द्या, असं पत्र फिर्यादींनी औरंगाबादचे पोलीस महानिरीक्षक यांना लिहिलेलं आहे.

(Shepherd beaten to death Video Viral On Social Media Aurangabad police file a case)

हे ही वाचा :

कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात

ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, माजी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI